
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने माजी कर्णधार अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडला आहे. त्याने सर्वांत जलद 250 विकेट घेण्याचा विक्रम केला.
इंदूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने माजी कर्णधार अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडला आहे. त्याने सर्वांत जलद 250 विकेट घेण्याचा विक्रम केला.
IPL 2020 : अरे व्वा! मुंबई इंडियन्समध्ये आता खेळणार 'हा' वर्ल्डकप गाजविलेला गोलंदाज
बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हक याला बोल्ड करत त्याने घरच्या मैदानांवर 250 विकेट पूर्ण केल्या. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेचा माजा फिरकीपटू मुथ्थय्या मुरलीधरन याच्याही विक्रमाशी बरोबरी केली. त्याने 42 कसोटींमध्ये 250 बळी घेतले. मुरलीधरनलासुद्धा 250 बळी घेण्यासाठी एवढेच सामने खेळावे लागले होते.
250 Test wickets at home for @ashwinravi99. He becomes the third Indian bowler to do so after @anilkumble1074 & @harbhajan_singh. pic.twitter.com/x1Q6fTonsi
— BCCI (@BCCI) November 14, 2019
अनिल कुंबळेंनी 250 बळी घेण्यासाठी 43 सामने खेळले होते तर भारताचा फिरकीपटू हरभजनसिंग याने 250 बळी घेण्यासाठी 51 सामने खेळले होते.
सर्वांत जलद 250 बळी
आर अश्विन- 42 सामने
मुरलीधरन- 42 सामने
अनिल कुंबळे- 43 सामने
रंगना हेरथ- 44 सामने
डेल स्टेन- 49 सामने
हरभजनसिंग- 51 सामने