Ravichandran Ashwin : एकच वाघ! अश्विन आशियात 'अशी' कामगिरी करणारा ठरला एकमेव कसोटीपटू

Ravichandran Ashwin vs AUS 1st Test
Ravichandran Ashwin vs AUS 1st Testesakal

Ravichandran Ashwin vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय फिरकीपटूंपुढे नांगी टाकली. भारताने कांगारूंचा पहिला डाव 177 धावात गुंडाळला. भारताकडून रविंद्र जडेजाने 47 चेंडूत 5 विकेट्स घेत मोठा वाटा उचलला. मात्र अश्विनने देखील 3 विकेट्स घेत कांगारूंचा डाव लवकर संपवण्यासाठी हातभार लावला.

Ravichandran Ashwin vs AUS 1st Test
IND vs AUS: स्मिथचा थम्स अप, जडेजाने केले क्लीन अप! चकवा देत केली दांडी गुल

अश्विनने आज फक्त हातभार लावला नाही तर त्याने आज आपल्या कसोटीतील 450 विकेट्स घेण्याचा माईलस्टोन काही विक्रम करत पार केला. सर्वात म्हत्वाचे म्हणजे अश्विनने एक असा विक्रम आपल्या नावावर केला जो विक्रम आशिया खंडातील कोणत्याही संघाच्या कसोटीपटूला करता आलेला नाही.

अश्विनने 450 वी कसोटी विकेट घेताच तो कसोटी क्रिकेट इतिहासात आशिया खंडातील 3000 धावा आणि 450 विकेट्स घेणारा पहिला आणि एकमेव कसोटीपटू ठरला. अश्विन आता भारताच्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत 619 विकेट्स घेणारा अनिल कुंबळे पहिल्या, 450 विकेट्स घेत अश्विन दुसऱ्या तर 434 विकेट्स घेणारे कपिल देव तिसऱ्या स्थानावर आहेत.

Ravichandran Ashwin vs AUS 1st Test
INDW vs PAKW : अवघ्या 19 वर्षाच्या मुलीमुळे पाकिस्तानचा उडालाय थरकाप; सुपर संडेला होणार सुपर मुकाबला

भारताचा ऑफ स्पिनर अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 450 विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने 80 कसोटीत 450 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहेत. अश्विनने हा कारनामा 89 कसोटीत केला.

Sports Latest News)

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com