World Cup 2019 : आमची हीच चूक ठरली सर्वांत महाग : शास्त्री 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि करोडो भारतीयांच्या विश्वकरंडक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या. गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवाला फलंदाजीचे अपयश कारणीभूत होते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही हे मान्य करत चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणंच आम्हाला भोवल असे त्यांनी स्पष्ट केले. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि करोडो भारतीयांच्या विश्वकरंडक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या. गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवाला फलंदाजीचे अपयश कारणीभूत होते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही हे मान्य करत चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणंच आम्हाला भोवल असे त्यांनी स्पष्ट केले. 

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ''मधल्या फळीत आम्हाला खरंच एका अनुभवी फलंदाजाची गरज होती आणि तिच उणीव आम्हाला भासली. आता या सार्या गोष्टींचा विचार भविष्यासाठी करायचा आहे कारण चौथा क्रमांक भारतीय संघासाटी नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. लोकेश राहुल, विजय शंकर सारखे खेळाडू यंदाच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी होते. मात्र दुखापतीमुळे सगळं चित्र पालटलं, आणि नंतर जे काही घडलं त्यावर नियंत्रण ठेवणं आमच्या हातात नव्हतं.''

गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाने सर्वोत्तम खेळ केला आहे. त्यामुळेच एका खराब सामन्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असेही त्यांनी आवर्जन सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravin Shastri confessed about lack of experience at number four in World Cup 2019