Ravindra Jadeja : 'अशी' कामगिरी करणारा रविंद्र जडेजा ठरला पहिला भारतीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja IND vs AUS 2nd Test

Ravindra Jadeja : 'अशी' कामगिरी करणारा रविंद्र जडेजा ठरला पहिला भारतीय

Ravindra Jadeja IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची फिरकी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 167 धावातच गारद केला. पहिल्या सत्रात आणि दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला. या माऱ्यासमोर कांगारूंच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने झुंजार फलंदाजी करत 81 धावांची खेळी केली. तो क्रीजवर होता त्यावेळी भारतासाठी तो डोकेदुखी ठरत होता. अखेर रविंद्र जडेजाने भारताची ही डोकेदुखी दूर केली. त्याने उस्मान ख्वाजाला 81 धावांवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.

ऑस्ट्रेलियाचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात असताना दुसऱ्या बाजूने उस्मान ख्वाजाने तग धरत कांगारूंना शंभरी पार करून दिली होती. दरम्यान, ट्रॅव्हिस हेड 12 धावांवर बाद झाल्यानंतर ख्वाजाने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि कांगारूंना 150 चा टप्पा पार करून दिला. ख्वाजा शतकी मजल मारणार असे वाटत असतानाच त्याने जडेजाच्या गोलंदाजीवर एक रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र जडेजाने चेंडू लेग स्टम्पवर टाकला त्यामुळे उस्मान ख्वााजाला रिव्हर्स स्वीप व्यवस्थित मारता आला नाही. तिकडे पॉईंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या केएल राहुलने हवेत उडालेला हा चेंडू एका हाताने डाईव्ह मार पकडला. याच विकेटबरोबरच रविंद्र जडेजाने एक मोठा विक्रम देखील केला. जडेजा कसोटीत सर्वात वेगाने 250 विकेट्स आणि 2500 धावा करणारा पहिला भारतीय तर जगातला दुसरा खेळाडू ठरला.

भारतीय गोलंदाजांनी कांगारूंच्या फलंदाजीला खिंडार पाडत पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशीच कांगारूंची अवस्था 6 बाद 164 धावा अशी केली. भारताकडून अश्विनने 3 रविंद्र जडेजाने 1 आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने 81 धावांची धडाकेबाज खेळी केली.

(Sports Latest News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?