
Ravindra Jadeja : जडेजाच्या एका ओळीच्या ट्विटनं चर्चेला उधाण; निशाण्यावर आहे तरी कोण?
Ravindra Jadeja Tweet : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर आहे. तो आशिया कप 2022 नंतर टीम इंडियाकडून खेळलेला नाही. त्याला श्रीलंकेविरूद्धच्या वनडे संघातही स्थान देण्यात आले नव्हते. दरम्यान, भारताने श्रीलंकेविरूद्धचा दुसरा सामना 4 विकेट्स राखून जिंकला. या विजयानंतर रविंद्र जडेजाने एक क्रिप्टिक ट्विट केले. या ट्विटमुळे क्रिकेट चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.
हेही वाचा: Virat Kohli : विराटही झाला होता कॅप्टन्सीसाठी उतावळा; धोनीने कसोटी कॅप्टन्सी देऊनही विराटने...
रविंद्र जडेजाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'काही बोलू नका फक्त हसा' असे ट्विट करत स्मितहास्य केलेला इमोजी देखील वापरला आहे. रविंद्र जडेजाने हे गूढ ट्विट का आणि कोणत्या उद्येशाने केले आहे याबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता रविंद्र जडेजाने हे ट्विट निवडसमितीसाठी केल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.
रविंद्र जडेजाच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. तो आता या दुखापतीतून सावरत असून एनसीएमध्ये सराव देखील सुरू केला आहे. या दुखापतीमुळे जडेजा टी 20 वर्ल्डकपला देखील मुकला होता. त्यानंतर त्याला बांगलादेश दौऱ्यावरील कसोटी संघात स्थान दिले होते. मात्र तो अजून पूर्णपणे फिट नसल्याने त्याचे नाव मागे घेण्यात आले. तो श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत देखील भारतीय संघात नव्हता.
हेही वाचा: IND vs SL : भारतीय संघाला मोठा धक्का; द्रविडची तब्येत बिघडली, चेकअपसाठी बेंगळुरूला रवाना
रविंद्र जडेजा न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत देखील पुनरागमन करेल याची शाश्वती देता येत नाहीये. निवडसमितीने अजून न्यूझीलंड मालिकेतील वनडे आणि टी 20 संघ जाहीर केलेला नाही. जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे जडेजाचे पुनरागमन खडतर असणार यात शंका नाही.
रविंद्र जडेजा हा भारतीय संघात फिरकी अष्टपैलू म्हणून आपला भुमिका बजावतो. तो गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररणक्षणात देखील आपले मोलाचे योगदान देतो. रविंद्र जडेजा 2013 पासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. 2023 च्या लिलावापूर्वी चेन्नईने जडेजाला रिटेन केले होते.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'