Virat Kohli : विराटही झाला होता कॅप्टन्सीसाठी उतावळा; धोनीने कसोटी कॅप्टन्सी देऊनही विराटने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli MS Dhoni Captaincy

Virat Kohli : विराटही झाला होता कॅप्टन्सीसाठी उतावळा; धोनीने कसोटी कॅप्टन्सी देऊनही विराटने...

Virat Kohli MS Dhoni Captaincy : भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात कॅप्टन्सीवरून टसल सुरू आहे. हार्दिकला टी 20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून आता त्याला वनडे कॅप्टन्सीचे देखील वेध लागले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच श्रीधर यांनी आपल्या पुस्तकातून टीम इंडियाची बरीच रहस्य उघड केली आहेत.

हेही वाचा: IND vs SL : भारतीय संघाला मोठा धक्का; द्रविडची तब्येत बिघडली, चेकअपसाठी बेंगळुरूला रवाना

श्रीधर यांच्या पुस्ताकात उल्लेख केल्यानुसार भारताचा माजी कर्णधार विराट कोहली देखील महेंद्रसिंह धोनीकडून वनडे, टी 20 ची कॅप्टन्सी घेण्यासाठी उतावळा झाला होता. श्रीधर आपल्या पुस्तकात दावा करतात की, विराट कोहलीला ज्यावेळी धोनीने कसोटीची कॅप्टन्सी दिली होती त्यावेळी विराट कोहली वनडे आणि टी 20 ची कॅप्टन्सी मिळवण्यासाठी देखील उतावळा झाला होता. त्याला लवकरात लवकर तीनही फॉरमॅटचा कर्णधार व्हायचं होतं.

मात्र यावेळी रवी शास्त्रींनी त्याच्या महत्वकांक्षांना वेसन घातले. रवी शास्त्री विराटला म्हणाले होते की तुला धोनीने कसोटी कॅप्टन्सी दिली आहे. आता तुला जरा वाट पहायला हवी. दरम्यान, श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात धोनीच्या वनडे निवृत्तीबाबतही कोणाला माहिती नसलेला किस्सा लिहिला आहे.

हेही वाचा: IND vs SL: गौतम पुन्हा 'गंभीर'रित्या विराट कोहलीवर बरसला! 'शतक ठोकणे चांगले, पण...'

धोनीने पंतसोबत बोलताना दिले निवृत्तीचे संकेत

त्यांनी पुस्तकात दावा केला आहे की, महेंद्रसिंह धोनीने न्यूझीलंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यावेळीच निवृत्तीचा विचार पक्का केला होता. श्रीधर आपल्या पुस्तकात लिहितात की, 'न्यूझीलंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्याच्या रिझर्व डे दिवशी धोनीने निवृत्तीचे संकेत दिले होते. रिझर्व डे दिवशी न्यूझीलंडला काही षटके खेळायची होती. त्यानंतर आम्ही आमचा डाव सुरू करणार होतो.'

'त्यादिवशी सामना लवकर सुरू होणार होता. ऋषभ पंत आणि महेंद्रसिंह धोनी चहाच्या टेबलवर एकत्र बसले होते. त्यावेळी पंतने धोनीला विचारले की काही खेळाडू स्वतःच लंडनला जाण्याचा विचार करत आहेत तुम्ही पण येणार आहात का? यावर धोनी म्हणाला की नाही ऋषभ मी संघासोबतचा टीम बसमधील शेवटचा प्रवास चुकवू इच्छित नाही.'

(Sports Latest News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'