Ravindra Jadeja : टाटा बाय-बाय खतम! जडेजा CSK ला करणार राम राम?

रवींद्र जडेजा IPL 2023 मध्ये सीएसकेकडून खेळणार नाही?
Ravindra Jadeja In CSK
Ravindra Jadeja In CSKSAKAL

Ravindra Jadeja In CSK: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्स हा संघ आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. IPL 2022 मध्ये स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र तो त्या हंगामामध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 8 पैकी 6 सामने गमावले. खराब कामगिरीमुळे निराश होऊन त्याने मध्यंतरी कर्णधारपद सोडले आणि दुखापतीमुळे तो स्पर्धेतूनही बाहेर पडला.

Ravindra Jadeja In CSK
ENG vs IND T20I : फॉर्मसाठी चाचपडणाऱ्या विराट कोहलीला शेवटी संधी

चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. जडेजाने सोशल मीडियावर असं काही केलं कि फॅन्स म्हणतायत तो 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज सोडतोय. रवींद्र जडेजाने या संकेतात त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून संघाच्या 2021 आणि 2022 हंगामाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट करून टाकले आहेत. यामुळे जडेजा आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. जडेजा आणि सीएसकेनेही एकमेकांना अनफॉलो केले.

Ravindra Jadeja In CSK
Virat Kohli : अश्विनला डच्चू मिळूतो तर विराटला का नाही, माजी कर्णधाराचा सवाल

महेंद्रसिंग धोनीला त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. सेहवाग, रैना, हरभजन या सारख्या सर्वांनी धोनीला सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर धोनीला शुभेच्छा देणे टाळले. यावरून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. रवींद्र जडेजा गेल्या १० वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्ज संघाशी जोडला गेला आहे. रविंद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जने 2022 मेगा लिलावात रिटेन केले होते. याचबरोबर सीएसकेने त्याला 16 कोटी रूपये देऊन आपली पहिली पसंती बनवले होते. धोनीला सीएसकेने 12 कोटी रूपये देऊन रिटेन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com