Ravindra Jadeja Injury : 'दुखापतीनंतर या वयात पुनरागमन करणे सोपे नाही' - जडेजा

जडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; विश्वकरंडक खेळण्याबाबत अनिश्चितता
Ravindra Jadeja Injury
Ravindra Jadeja Injury sakal

Ravindra Jadeja Injury : दुखापतीमुळे आशिया करंडकातून बाहेर झालेल्या रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. जडेजाने इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली. लवकरच मी पुनरागमनाच्या तयारीला लागणार आहे, असेही तो म्हणाला.

Ravindra Jadeja Injury
ICC T20I Rankings : सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानावर घसरण

आशिया करंडकात ‘सुपर-फोर'' फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी जडेजा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही आणि तो स्पर्धेबाहेर गेला आहे, अशी घोषणा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केली होती. जडेजाच्या जागेवर अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळू शकेल की नाही, याविषयी अद्याप निश्चित माहिती नाही. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून याबद्दल बीसीसीआय, माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, डॉक्टर आणि पाठीराख्यांचे आभार मानतो.

Ravindra Jadeja Injury
Asif Ali-Fareed Ahmad Fight : मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट

मोसमात जबरदस्त कामगिरी

जडेजाने यंदाच्या मोसमात फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. यंदा नऊ टी-२० सामन्यात जडेजाने आठ डावांत ५०.२५ च्या सरासरीने २०१ धावा केल्या. नाबाद ४६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याशिवाय पाच गडीही बाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com