

Aadar Poonawalla RCB bid
esakal
Aadar Poonawalla: सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य अधिकारी आदर पूनावाला यांनी नुकतेच एक मोठी घोषणा केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ही आयपीएलची प्रसिद्ध टीम खरेदी करण्यासाठी ते येत्या काही महिन्यांत एक शक्तिशाली आणि आकर्षक बोली देणार आहेत. ही माहिती त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आहे.