
बंगळुरूत बुधवारी सायंकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं आरसीबीच्या विजयी रॅलीला गालबोट लागलं. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. विराट कोहलीने या घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर व्यक्त करायला शब्द नाहीत अशा शब्दात विराटने भावना व्यक्त केल्या आहेत.