RCB साठी वाईट बातमी; 'या' दिग्गज खेळाडूनं केलं नियमांचं उल्लंघन

Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangaloreesakal
Summary

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज सामना होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bangalore) आज (शुक्रवार) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातील दुसरा क्वालिफायर खेळायचा आहे. त्यांचा हा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच त्यांच्यासाठी चांगली बातमी आलेली नाहीय. संघाचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) आयपीएलनं चांगलंच सुनावलंय. कार्तिकवर आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

IPL-2022 मधील एलिमिनेटर सामन्यात कार्तिकवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हा सामना बंगळुरू आणि लखनऊ यांच्यात 25 मे रोजी कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर (Eden Gardens Stadium) खेळला गेला. आयपीएलनं एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिलीय. कार्तिकनं कधी नियमांचं उल्लंघन केलं, हे निवेदनात नमूद करण्यात आलेलं नाहीय. याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीय.

Royal Challengers Bangalore
बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला सोडली राज्यसभेची जागा

आयपीएलनं आपल्या निवेदनात म्हटलंय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज दिनेश कार्तिकला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध त्याच्या संघाच्या एलिमिनेटर सामन्यात इंडियन प्रीमियर लीगच्या आचारसंहितेचं (Indian Premier League Code of Conduct) उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आलंय. कार्तिकनं कलम 2.3 च्या लेव्हल 1 चं उल्लंघन केलं आहे, तसेच शिक्षाही स्वीकारलीय. लेव्हल-1 गुन्ह्यांमध्ये सामनाधिकारीचा निर्णय अंतिम असतो.

Royal Challengers Bangalore
आर्यनला क्लीनचीटनंतर समीर वानखेडे म्हणाले, मला माफ करा..

या सामन्यात कार्तिकनं दमदार खेळी करत शेवटी वेगवान धावा केल्या. या सामन्यात कार्तिकनं 23 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं नाबाद 37 धावा केल्या. या सामन्यात शतक झळकावणाऱ्या रजत पाटीदारसोबत (Rajat Patidar) त्यानं 92 धावांची भागीदारी केली. पाटीदारनं या सामन्यात नाबाद 112 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com