कपिल देवनंतर महिंद्रसिंह धोनी, भारताला आता वर्ल्डकप कोण देणार; क्रिकेट प्रेमींचा प्रश्‍न

Reactions after the announcement of the retirement of Indian cricketer Mahendra Singh Dhoni
Reactions after the announcement of the retirement of Indian cricketer Mahendra Singh Dhoni

अहमदनगर : महेंद्रसिंह धोनीने शनिवारी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनादिवशी निवृत्त होण्याची घोषणा करुन क्रिकेट प्रेमींना धक्का दिला. स्वत:च्या कतृत्वावर त्याने क्रिकेटमध्ये भारताचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या निवृत्तीची घोषणा वाऱ्यासारखी सर्वत्र पोहचली अन्‌ त्याच्या अठवणीतील खेळीच्या चर्चा सुरु झाली आहे.

क्रिकेटप्रेमी प्रविण घोडके म्हणाले, २००५ मधील धोनीची खेळी पाहिली आणि मी त्याच्या प्रेमात पडलो. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या या सामन्यात १४८ धावा त्याने केल्या होत्या. विशाखापटण्‌म येथे हा सामना झाला होता. त्याची ती पहिलीच सेनच्युरी होता. त्याच्या त्या तुफान खेळीने तो प्रकाश झोतात आला. त्याचा सारखा भारतीय संघात यष्टीरक्षक होणे शक्य नाही. २००७ मध्ये टी२० चा वर्ल्ड कप त्याने आनला होता. २०११चा वर्ल्डकपही त्याने त्याने आनला होता. यासह अनेक सामने तो खेळला. गेल्यावर्षी इंग्लडमध्ये झालेला वर्ल्डकप अखेरचा होईल असे वाटले नव्हते.

दिनकर गवळी म्हणाले, २००७ मध्ये सर्व त्यावेळेसच्या वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतल्याने धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आणि. तेथून पुढे त्याने मागे वळून पाहिले नाही. ज्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार झाला तेव्हा पहिलाच वर्ल्डकप त्याने आणला होता. त्यानंतर तो पाच क्रमांकाला खेळू लागला होता. त्याच्या उत्कृष्ठ खेळीने अनेकांच्या मनात त्याने स्थान निर्माण केले होते.

भारतीय क्रिकेटला नवी उंची देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केली. याबाबत त्याने ट्विट केले आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आयपीएलसाठी चेन्नईला उड्डाण केलेल्या धोनीने निवृत्तीची घोषणा केली. त्यापाठोपाठ सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. सुरेश रैना आणि धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतात. त्यांच्या मैत्रीचे किस्से कायमच क्रिकेट प्रेमींच्या चर्चेचा विषय असतो. दोघांनी मिळून, चेन्नईला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा खेळाडू म्हणून सुरेश रैनाची ओळख होती.

एमएस धोनीने कर्णधार म्हणून 2007 मध्ये टी- 20 विश्वचषक, 2011 मध्ये विश्वचषकात, 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी20 विश्‍वचषक जिंकला. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व धोनीकडे होते. 2016 मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. त्या सामन्याने धोनीच्या निवृत्तीचे संकेत दिले होते.

घोडके म्हणाले, २०११ मध्ये विश्‍वचषक धोनीने जिंकला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमहर्षक सामान्यात धोनीच्या अविस्मरणीय खेळीमुळे भारताला पहिला वर्ल्डकप जिंकता आला होता. माजी कर्णधार कपीलदेवनंतरचा हा दुसरा वर्ल्डकप धोनीच्या नावावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com