World Cup 2019 : भारताच्या पराभवाची कारणे

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान दहाव्या सामन्यात संपुष्टात आले. साखळीतील 9 सामन्यात 7 विजय, 1 पराभव अशा जबरदस्त कामगिरीने त्यांनी उपांत्य फेरी गाठली. पण, उपांत्य फेरीत त्यांना न्यूझीलंडने निष्प्रभ केले. या पराभवाची कारणे... 

-न्यूझीलंडची सलामीची जोडी झटपट बाद केल्यावर विल्यमसन-रॉस टेलर जोडीवर नियंत्रण ठेवण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश 

-खेळपट्टीचे स्वरुप लक्षात घेता संघात जास्तीचा गोलंदाज न खेळविण्याची चूक महागात पडली. दोन फिरकी गोलंदाजांऐवजी शमीला वगळल्याचा फटका 

-पावसाची शक्‍यता असतानाच त्या सुमारास टेलरने फिरकी गोलंदाज चहलवर केलेला हल्ला महत्त्वाचा 

-आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजांवरील फाजील आत्मविश्‍वास महागात पडला 

-सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल चार धावांत बाद 

-पॉवर प्लेमधील संथ फलंदाजी. डाव सावरल्यावर आक्रमक होताना फटक्‍यांची चुकीची निवड 

-न्यूझीलंडने फलंदाजी, गोलंदाजीत दाखवलेली शिस्त भारतीय संघाला दाखवता आली नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reasons behind India Lost against New Zealand