नवी दिल्ली : गतवर्षात घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचण्यांतून २६० भारतीय खेळाडू दोषी सापडले असल्याची माहिती राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी देण्यात आली. या गतवर्षातील ही आकडेवारी सर्वाधिक असण्याची शक्यता आहे..राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक एजन्सी (नाडा)कडून २०२४ मध्ये ७,४६६ उतेजक चाचण्या घेण्यात आल्या. भारतात या चाचण्या आतापर्यंतच्या सर्वाधिक होत्या. २०१९ मध्ये २२४ चाचण्या या सर्वाधिक होत्या. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक एजन्सी (वाडा) यांच्या अहवालानुसार २०२३ मध्ये भारतात सर्वाधिक २१३ जण उत्तेजक चाचणीत दोषी सापडले होते..गेल्या काही वर्षांत उत्तेजक चाचणीत दोषी सापडण्याचे भारतीय खेळाडूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याची कल्पना सरकारला आहे का, असा प्रश्न राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी विचारला. उत्तेजकमुक्त भारत करण्यासाठी आम्ही सरकार म्हणून पूर्ण प्रयत्न करीत आहोत, असे उत्तर क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी दिले..Rajat Patidar चा मोबाईल नंबर 'दुकानदारा'ला मिळाला; विराट, डिव्हिलियर्सचे फोन येऊ लागले; पुढे जे घडले ते भन्नाट होते....२०२३ मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये ७६ जण ॲथलेटिक्समधील होते. त्यानंतर वेटलिफ्टिंग (४३), कुस्ती (२९) आणि बॉक्सिंग (१७) अशी आकडेवारी आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.