Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Regional Sports Board Dominate Matunga Workshop in Shivneri Kabaddi Tournament: शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या व्यावसायिक गटात अजिंक्य कापरे आणि साई केरूडच्या शानदार कामगिरीच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी दुसऱ्या फेरीत माटुंगा वर्कशॉपचा पराभव केला.
Regional Sports Board Dominate Matunga Workshop in Shivneri Kabaddi Tournament

Regional Sports Board Dominate Matunga Workshop in Shivneri Kabaddi Tournament

Sakal

Updated on: 

SHIVNERI KABADDI TOURNAMENT: रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर माटूंगा वर्कशॉपचा ४२-१० असा धुव्वा उडवित शिवनेरी सेवा मंडळ, दादर यांच्या वतीने आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या व्यावसायिक गटाच्या तिसऱ्या फेरीत धडक दिली.

तिसऱ्या फेरीत रिजनल स्पोर्ट्स बोर्डाचा मुकाबला आता बीपीटीशी होईल. अजिंक्य कापरेच्या पल्लेदार चढाया आणि त्याला साई केरूडच्या पोलादी पकडीची साथ मिळाल्यामुळे रिजनल स्पोर्टस बोर्डाला माटूंगा वर्कशॉपवर ३२ गुणांच्या फरकाने दणकेबाज विजय मिळवता आला.

Regional Sports Board Dominate Matunga Workshop in Shivneri Kabaddi Tournament
Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com