नाईट चॅलेंजर मॅरेथॉनसाठी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 16 जानेवारी 2019

राज्यातील पहिली आणि देशातील दुसरी अशा या नाईट मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा साताऱ्याचे दुसरे वर्ष असून, सुमारे तीन हजार स्पर्धक सहभागी होतील, असा विश्‍वास संस्थापिका राजवी हलगेकर यांनी व्यक्त केला.

सातारा - एएफएसएफ फाउंडेशनच्या वतीने यंदा एक जूनला एएफएसएफ सातारा नाईट चॅलेंजर मॅरेथॉन आयोजिण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी http://afsf.in/night-marathon/registration/ या संकेतस्थळावर 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

राज्यातील पहिली आणि देशातील दुसरी अशा या नाईट मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा साताऱ्याचे दुसरे वर्ष असून, सुमारे तीन हजार स्पर्धक सहभागी होतील, असा विश्‍वास संस्थापिका राजवी हलगेकर यांनी व्यक्त केला.

सौ. हलगेकर म्हणाल्या, ""एएफएसएफ फाउंडेशन ही संस्था लिव्ह फिअरलेस हे ब्रीद वाक्‍य घेऊन विशेषतः महिलांचे आरोग्य व सुरक्षाच्या दिशेने वाटचाल म्हणून नाईट चॅलेंजर मॅरेथॉनचे आयोजन करते. ही मॅरेथॉन दहा, 21 तसेच 42 किलोमीटर अंतराची आहे. यामुळे साताऱ्यातील पहिली फूल मॅरेथॉन म्हणून त्याची देशातील फूल मॅरेथॉनमध्ये गणना केली जाते. संस्थेद्वारे गेली तीन वर्ष महिन्याच्या शेवटच्या रविवारी मॅरेथॉन आयोजित केली जाते.'' गतवर्षीच्या मॅरेथॉनची चित्रफित नुकतीच पोलिस उपअधीक्षक समीर शेख, नगराध्यक्ष माधवी कदम आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. या वेळी फाउंडेशनचे सदस्य मिलिंद हळबे, कल्पेश गुजर, पंकज राठी, रेणू येळगावकर, स्वप्नील राऊत, श्वेता राजेमहाडिक, चेतन शिंदे, उमेश लोया, अमेय भागवत, कमलेश भट्टड, पूनम कडू उपस्थित होते. सातारकरांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन हलगेकर यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Register till 31 Jan for Night Challenger Marathon