World Cup 2019 : 19 जुलै 1952 ची पुनरावृत्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

- रवींद्र जडेजाने विश्‍वकरंडकातील सातव्या अथवा त्याखालील क्रमांकावरील भारतीय फलंदाजाच्या सर्वाधिक धावा केल्या. 
- धोनीची गणना सर्वांत वेगाने धावा घेणाऱ्या फलंदाजांत होते, तो अखेरच्या विश्‍वकरंडक लढतीत धावचीत, कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही धावचीत

वर्ल्ड कप 2019 : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओल्ड ट्रॅफर्डला 1952 च्या मालिकेतील तिसरी कसोटी झाली होती. त्यात भारताची अवस्था सुरुवातीस 3 बाद 5, 5 बाद 17 अशी होत डाव 58 धावांत आटोपला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारताची सुरुवात 3 बाद 5 झाली. ही लढतही ओल्ड ट्रॅफर्डवरच होती. 

...तेव्हा ऑस्ट्रेलियाची सरशी 
विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचे आघाडीचे तीन फलंदाज पाच धावांत बाद होण्याची ही दुसरी वेळ. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विंडीजविरुद्ध मोहालीत 3 बाद 8, पण त्या वेळी 8 बाद 207 धावा करीत विजय 

पाऊस आला तरीही पराभव 
भारताचे सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यावर क्रिकेट रसिक पावसाची प्रतीक्षा करीत होते, पण 25 व्या षटकानंतर पाऊस आला असता तरी भारत पराजित झाला असता, त्या वेळी भारताच्या धावा होत्या, 5 बाद 77; तर डकवर्थ लुईसनुसार आवश्‍यक होत्या 139. 

- रवींद्र जडेजाने विश्‍वकरंडकातील सातव्या अथवा त्याखालील क्रमांकावरील भारतीय फलंदाजाच्या सर्वाधिक धावा केल्या. 
- धोनीची गणना सर्वांत वेगाने धावा घेणाऱ्या फलंदाजांत होते, तो अखेरच्या विश्‍वकरंडक लढतीत धावचीत, कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही धावचीत 
- रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली हे भारताचे आघाडीचे तीन फलंदाज एका धावेवरच बाद. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच 
- सलग दोन स्पर्धांत अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम आता न्यूझीलंडकडूनही. यापूर्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया (सलग चार स्पर्धांत), वेस्ट इंडीज (सलग तीन स्पर्धांत) तसेच इंग्लंड, श्रीलंका (प्रत्येकी दोनदा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repeat same incident of 19 July 1952 in World Cup 2019 semi final India vs New Zealand