World Cup 2019 : विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटविण्याची तयारी

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जुलै 2019

भारतीय संघाचा विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर आता भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा आहे. दैनिक जागरणने दिलेल्या अहवालानुसार भारतीय संघात असंतोष असल्याचे समजत आहे. 

वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड : भारतीय संघाचा विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर आता भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा आहे. दैनिक जागरणने दिलेल्या अहवालानुसार भारतीय संघात असंतोष असल्याचे समजत आहे. 

या अहवालानुसार विश्वकरंडकातून बाहेर पडल्यावर या असंतोषाला सुरवात झाली. संघात सध्या दोन गट पडले आहेत. एक गट कर्णधार विराट कोहलीला पाठींबा देत आहे तर दुसरा उपकर्णधार रोहित शर्माच्या पाठीशी आहे. तसेच संघनिवड करतानाही दुजाभाव केला जात असल्याचे समोर आले आहे. 

या अहवालात सांगितल्याप्रमाणे कोहलीच्या बाजूने जे खेळाडू आहेत त्यांची संघातील जागा अढळ आहे. मात्र, रोहितच्या गटात असलेल्यांना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच लोकेश राहुल सातत्याने अपयशी ठरत असतानाही त्याला संघात स्थान दिले जात आहे. यावरुनही संघात वाद सुरु आहेत.

शेवटी या अहवालानुसार संघातील काही खेळाडू प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांच्या कामाबद्दलही नाराज आहेत. त्यामुळे त्याला आता पदावरुन हटवावे अशा मागणी करण्यात येत आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report claims Split in Indian team over Virat Kohli and Rohit Sharma