Rey Mysterio Sr. Passes Awayesakal
क्रीडा
Rey Misterio Dies: रे मिस्टेरिओ सीनियर यांचे वयाच्या ६६व्या वर्षी निधन; WWE च्या दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
WWE Legend Rey Mysterio Sr. Dies at 66: प्रसिद्ध मेक्सिकन कुस्तीपटू रे मिस्टेरिओ सीनियर याने वयाच्या ६६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Rey Misterio Sr. die: मेक्सिकोचे दिग्गज व्यावसायिक कुस्तीपटू आणि प्रशिक्षक रे मिस्टेरिओ सीनियर यांचे वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले. ते WWE Hall of Fame रे मिस्टेरिओ व सुपरस्टार डॉमिनिक मिस्टेरिओचे काका होते. मिस्टेरियो यांचा मुलगा मिग्युएल आरोन लोपेझ हर्नांडेझ याने त्याच्या फेसबूक पोस्टवरून ही बातमी दिली. मिस्टेरिओ १९७६ मध्ये व्यावसायिक कुस्तीपटू झाले आणि २००९ पर्यंत ते सक्रिय राहिले. त्यांनी त्यानंतर काही काळ पुनरागमन केले होते, परंतु २०२३ मध्ये ते शेवटची फाईट खेळले.