Richa Ghosh receiving the Bang Bhushan award and DSP appointment certificate from West Bengal Government officials, celebrating her contribution to Indian women’s cricket.

Richa Ghosh receiving the Bang Bhushan award and DSP appointment certificate from West Bengal Government officials, celebrating her contribution to Indian women’s cricket.

esakal

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

Richa Ghosh Appointed as DSP by West Bengal Government : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिले नियुक्ती पत्र ; पश्चिम बंगालमध्ये रिचावर बक्षीसांचा वर्षाव
Published on

Richa Ghosh Bang Bhushan: भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. यानंतर या विश्वविजयी टीम इंडियावर केवळ कौतुकाचाच नव्हे तर बक्षीसांचाही वर्षाव सुरू आहे. या टीममधील खेळाडूंना आता त्यांच्या राज्यांकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जात आहे. 

याच पार्श्वभूमीवर आता भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज अन् विकेटकीपर रिचा घोष हिला पश्चिम बंगाल पोलिसात उप-पोलीस अधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी)च्या सत्कार समारंभात तिला स्वतः नियुक्ती पत्र दिले. विश्वचषक विजयात रिचाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

याशिवाय, पश्चिम बंगाल सरकारकडून रिचा घोषला "बंगभूषण" पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच बंगाल सरकारने तिला सोन्याची साखळी देखील प्रदान केली आहे. याशिवाय क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने तिला सोन्याची बॅट आणि सोन्याचा चेंडू प्रदान केला आहे.

Richa Ghosh receiving the Bang Bhushan award and DSP appointment certificate from West Bengal Government officials, celebrating her contribution to Indian women’s cricket.
Jewellery Shop Robbery Video : ज्वेलरी शॉप लुटण्यासाठी महिलेने दुकानादारांच्या डोळ्यात फेकलं तिखट, पण तिथंच पकडली गेली अन् मग...

 एवढंच नाहीतर, रिचाला ३४ लाख रुपये रोख बक्षीस देण्यात आले. रिचाला ही रक्कम यासाठी देण्यात आली कारण तिने विश्वचषक अंतिम सामन्यात केलेल्या ३४ धावा, भारताच्या विजयात निर्णायक ठरल्या होत्या. तर रिचा घोषच्या आधी  या वर्षी जानेवारीमध्ये, अष्टपैलू दीप्ती शर्माची उत्तर प्रदेश पोलिसात डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com