Ricky Ponting : खेळपट्टीचा खेळ भारतावरच उलटला... रिकी पाँटिंगने सांगितलं भारताच्या पराभवाचं खरं कारण

रिकी पाँटिंग : अहमदाबाद पिचवरील चर्चेचं वक्तव्य
Ricky Ponting On Ahmedabad Pitch
Ricky Ponting On Ahmedabad Pitch esakal

Ricky Ponting On Ahmedabad Pitch : भारत मायदेशात वर्ल्डकप खेळत असूनही भारताला अंतिम फेरीत पोहचून देखील वर्ल्डकपवर आपले नाव कोरता आले नाही. या सामन्यापूर्वी प्रत्येकजण अहमदाबादमध्ये कोणती खेळपट्टी असेल याबाबत चर्चा करत होता. या सामन्यात आधी वापरलेलीच खेळपट्टी वापरण्यात आली.

त्यामुळे सुरूवातीपासूनच संथ खेळली. या संथ खेळपट्टीवर भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. अन् दव पडल्यानंतर गोलंदाजी करावी लागली. दरम्यान, पराभवानंतर समालोचन करत असलेल्या रिकी पाँटिंगने एक बोचरं वक्तव्य केलं. तो म्हणाला की मी स्पष्ट सांगू का भारताने केलेली खेळपट्टी त्यांच्यावरच उलटली.

Ricky Ponting On Ahmedabad Pitch
ICC World Cup Team : आयसीसीने निवडली वर्ल्डकपची टीम; कमिन्स जिंकला तरी रोहितच कर्णधार

क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगने सांगितले की खेळपट्टीबाबत काही ऑस्ट्रेलियन खेळाडू चिंतेत होते. त्यानंतर पाँटिंगने त्यांना समजावले.

पाँटिग म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू या खेळपट्टी बाबत चिंतेच होते. मात्र मी त्यांना सांगितले की पिचबाबत चिंता करून नका ही एक क्रिकेट पिच आहे 22 यार्ड लांब फक्त तिथं जा आणि आपलं सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळा. आज त्यांनी असच केलं.'

Ricky Ponting On Ahmedabad Pitch
WC 2023 Narendra Modi Post : शमीला रडू कोसळलं, मोदींनी घेतली गळाभेट! म्हणाले...

खेळपट्टीमुळे ऑस्ट्रेलियाला मिळाली संधी

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनचं म्हणणं आहे की खेळपट्टीमुळे ऑस्ट्रेलियाला भारतावर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली. त्याने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, 'भारत अजूनही एक ताकदवर संघ आहे.

मात्र खेळपट्टीचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. भारताच्या चार गोलंदाजांनी चांगली फलंदाजी न करणे त्यांच्या पथ्यावर पडले. राहुल आणि कोहली जास्त जोखिम घेत खेळू शकले नाहीत.

(Sports Latest News)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com