WC 2023 Narendra Modi Post : शमीला रडू कोसळलं, मोदींनी घेतली गळाभेट! म्हणाले...

भारतीय क्रिकेट संघानं लाखो क्रिकेट चाहत्यांची निराशा केली हे जरी खरे असले तरी चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडुंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
 Narendra Narendra Modi video Mohammad Shami Met world cup 2023
Narendra Narendra Modi video Mohammad Shami Met world cup 2023

Narendra Narendra Modi video Mohammad Shami Met world cup 2023 : भारतीय क्रिकेट संघानं लाखो क्रिकेट चाहत्यांची निराशा केली हे जरी खरे असले तरी चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडुंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तुम्ही आम्हाला खूप आनंद दिला. सलग १० सामने जिंकून एका वेगळ्या झोनमध्ये तुम्ही आमचे मनोरंजन केले हे काही कमी नाही. तो दिवस तुमचा नव्हता. असेही म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियानं विश्वकपावर आपले नाव कोरले आणि भारतीय खेळाडुंच्या डोळ्यात अश्रु तरळले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय खेळाडुंची विचारपूस केली होती. तो व्हिडिओ आता सोशल मीडीयावर व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.

वेगवान भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी याची गळाभेट घेऊन मोदींनी शमीचे सात्वंन केले आहे. शमीनं त्याच्या इंस्टावरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे. अहमदाबाद येथे झालेल्या नरेंद्र स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा सहा गडी राखून पराभव केला. त्यानंतर संपूर्ण देशात भारतीय संघाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

कर्णधार रोहित शर्माला तर मैदानातच रडू कोसळल्याचे दिसून आले. त्याला त्याच्या चेहऱ्यावरील निराशा लपवता आली नाही. तो तातडीनं ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे आता शमीच्या त्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 Narendra Narendra Modi video Mohammad Shami Met world cup 2023
Suniel Shetty Post : 'माझ्या दृष्टीनं रोहित शर्मा हाच...' बॉलीवूडचा अण्णा काय बोलून गेला?

अंतिम सामन्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असे सांगण्यात आले होते. मोदींनी उपस्थिती लावली, पारितोषिक वितरणाला हे हजर होते. दरम्यान त्यांनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय संघाला आधार दिला. यावेळी त्यांनी मोहम्मद शमीची गळाभेट घेऊन त्याचे सांत्वन केले. तो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

 Narendra Narendra Modi video Mohammad Shami Met world cup 2023
Ind vs Aus Final: साथ तुझी माझी.. पराभवाच्या दुःखात अनुष्का विराटच्या पाठीशी ठाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com