Ricky Ponting Admitted : हृदय विकारामुळे रिकी पॉटिंग रूग्णालयात दाखल; समालोचन करत असतानाच..

Ricky Ponting
Ricky Ponting esakal

Ricky Ponting : ऑस्टेलियाचा माजी दिग्गज रिकी पॉटिंगला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त अनेक ऑस्ट्रेलिन माध्यमांनी दिले. पॉटिंग हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चॅनल 7 वर समालोचन करतो होता. दरम्यान, लंच ब्रेकमध्ये रिकी पॉटिंगला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त फॉक्स स्पोर्ट्स आणि डेली टेलिग्राफने दिले आहे.

Ricky Ponting
Patiala Jail : माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू जानेवारीच्या अखेरीस तुरुंगातून मुक्त होणार? कारण आलं समोर

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पॉटिंगची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीसाठी रूग्णालयात नेण्यात आले. सेव्हन स्पोर्ट्सच्या प्रवक्त्यांनी 'रिकी पॉटिंगची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे तो तिसऱ्या दिवशी उरलेल्या वेळेत समालोचन करणार नाहीये.' असे वक्तव्य दिले.

Ricky Ponting
IPL 2023: आयपीएलमध्ये नवा नियम; आता किती खेळाडू खेळणार?

गेल्या काही वर्षापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात अनेक अप्रीय घटना घडल्या आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियाचे दोन माजी दिग्गज खेळाडू रोड मार्श आणि शेन वॉर्न यांची ह्रदय विकारामुळे निधन झाले होते. डीन जॉन्स यांचे देखील 2020 मध्ये अचानक निधन झाले होते. त्यांना देखील ह्रदय विकाराचा त्रास झाला होता. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे विकेटकिपर आणि नेदरलँड्सचे प्रशिक्षक राहिलेल्या रेयान कॅम्पबेल यांना देखील ह्रदय विकाराचा त्रास जाणवू लागला होता. यातून ते थोडक्यात वाचले आहेत.

Ricky Ponting
Patiala Jail : माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू जानेवारीच्या अखेरीस तुरुंगातून मुक्त होणार? कारण आलं समोर

रिकी पॉटिंगने 168 कसोटी सामन्यात 51.85 च्या सरासरीने 13 हजार 378 धावा केल्या आहेत. यात 41 शतके आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने 375 सामन्यात 42.03 च्या सरासरीने 13 हजार 704 धावा केल्या आहेत. त्याने 17 टी 20 सामन्यात 401 धावा देखील केल्या आहेत. त्यात 2 अर्धशतकांचा देखील समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाने 1999, 2003, 2007 मध्ये जिंकलेल्या तीन वनडे वर्ल्डकप संघाचा तो भाग होता. 2003 आणि 2007 मध्ये त्याच्या नेतृत्वाखालीच ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com