Shah Rukh Khan On Rinku Singh: शाहरुख खान रिंकू सिंगला का म्हणाला - बाप, सोशल मीडियावर उडाली खळबळ

Shah Rukh Khan On Rinku Singh
Shah Rukh Khan On Rinku Singh

Shah Rukh Khan On Rinku Singh : रिंकू सिंगने आयपीएल 2023 मध्ये बॅटने दमदार कामगिरी केली. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 5 चेंडूत 5 षटकार ठोकले. आता त्याला टीम इंडियात स्थान मिळू शकते. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर झाले असले तरी टी-20 संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.

Shah Rukh Khan On Rinku Singh
MS Dhoni : 'माय लव्ह...' साक्षी तिच्या शेजारी होती तरी एअर होस्टेसने धोनीला दिली चिठ्ठी अन्...

रिंकू टी-20 संघासाठी फिट असल्याचे सांगितले जात आहे. अनेक दिग्गज खेळाडूही त्याच्या संघात समावेश करण्याच्या बाजूने आहेत. दरम्यान बॉलिवूडचा बादशाह आणि केकेआर टीमचा मालक शाहरुख खानने एका प्रश्नाच्या उत्तरात रिंकूला बाप म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार राडा झाला आहे.

Shah Rukh Khan On Rinku Singh
World Cup Qualifiers: या 4 संघांचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगले, आता 6 संघांमध्ये चुरशीची लढत

शाहरुख खान सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. यादरम्यान एका चाहत्याने त्याला केकेआरचा स्टार रिंकू सिंगसाठी एक शब्द बोलण्यास सांगितले. या प्रश्नावर किंग खानने दिलेल्या उत्तराने बरीच चर्चा रंगली आहे. या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखने रिट्विट करत लिहिले की, रिंकू हा बाप आहे, मुलगा नाही. . शाहरुखचे हे उत्तर लोकांना खूप आवडले. यापूर्वी आयपीएल 2023 मध्ये देखील शाहरुख खानने रिंकू सिंगचे कौतुक केले होते.

Shah Rukh Khan On Rinku Singh
IND vs WI : '...निवडकर्ते मूर्ख आहेत का?' सर्फराज खानला टीम इंडियातून डावलल्यानंतर BCCIचं स्पष्टीकरण

टी-20 उत्कृष्ट स्ट्राइक रेट

25 वर्षीय रिंकू सिंगचा टी-20 मध्ये स्ट्राइक रेट उत्कृष्ट आहे. त्याने 89 सामन्यांच्या 81 डावांमध्ये 30 च्या सरासरीने 1768 धावा केल्या आहेत. 10 अर्धशतके ठोकली. स्ट्राइक रेट 141 आहे, जो उत्कृष्ट आहे. 139 चौकारांशिवाय त्याने 80 षटकारही मारले आहेत. रिंकूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 163 धावांची नाबाद खेळीही खेळली आहे.

टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. 3 ऑगस्टपासून टी-20 मालिका सुरू होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना येथे संधी मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com