ENG vs IND : आक्रमक खेळी करत ऋषभ पंत इंग्लंडला एकटा भिडला

Rishabh Pant Counter attack England Bowling Record Equaling Partnership With Ravindra Jadeja
Rishabh Pant Counter attack England Bowling Record Equaling Partnership With Ravindra Jadeja esakal

England vs India 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत भारताची पहिल्या दिवशी 5 बाद 98 धावा अशी अवस्था झाली होती. मात्र ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी रचत संघाला नुसते सावरले नाही तर मजबूत स्थितीत देखील नेऊन ठेवले. ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत 111 चेंडूत 146 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने कसोटीतील आपल्या 2000 धावा देखील पूर्ण केल्या.

Rishabh Pant Counter attack England Bowling Record Equaling Partnership With Ravindra Jadeja
ENG vs IND Live : रूटने दिला चकवा; पंतचे दीडशतक हुकले

याचबरोबर पंत आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी (Partnership) रचली. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या विदेशातील सहाव्या विकेटसाठी केलेल्या सर्वात मोठ्या भागीदारीच्या विक्रमाशी बरोबरी केली. पंतने 89 चेंडूत शतक ठोकत आशिया बाहेर सर्वात वेगवान कसोटी शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले. यापूर्वी विरेंद्र सेहवागने विंडीजमध्ये 78 चेंडूत तर मोहम्मद अझरूद्दीनने इंग्लंडमध्ये लॉर्ड्समध्ये 88 चेंडूत शतक ठोकले होते.

ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा या डावखुऱ्या जोडीने भारताचा डाव 5 बाद 98 धावांपासून सावरायला सुरूवात केली. ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत धावांची गती वाढवली. तर दुसऱ्या बाजूने जडेजाने त्याला सावध पवित्रा घेत चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत दिवसाच्या तिसऱ्या सत्रात भारताला 200 चा टप्पा पार करून दिला.

Rishabh Pant Counter attack England Bowling Record Equaling Partnership With Ravindra Jadeja
ENG vs IND : IPL मधील रन मशिन करणार भारताविरूद्ध इंग्लंडचे नेतृत्व

दरम्यान, ऋषभ पंतने आपले कसोटीतील पाचवे शतक ठोकले. त्याने 89 चेंडूतच शतकी खेली पूर्ण केली. त्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटची भागीदारी 150 पार नेली तसेच भारताच्या 250 धावा देखील धावफलकावर लावले. दमलेल्या इंग्लिश गोलंदाजांनी त्यानंतरही पंत आणि जडेजाने धुलाई कामय ठेवत आपली भागीदारी द्विशतकापर्यंत नेली. याचबरोबर भारतानेही 300 चा टप्पा पार केला.

अखेर ऋषभ पंतचा झंजावात पार्ट टाईम गोलंदाज जो रूटने रोखला. त्याने पंतला 146 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com