ENG vs IND : IPL मधील रन मशिन करणार भारताविरूद्ध इंग्लंडचे नेतृत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs England ODI T20I Series Jos Buttler Will Lead Both England Teams

ENG vs IND : IPL मधील रन मशिन करणार भारताविरूद्ध इंग्लंडचे नेतृत्व

लंडन : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरूद्ध (England vs India) होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी आपला वनडे आणि टी 20 संघ घोषित केला आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने निवृत्ती जाहीर केल्यामुळे इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 संघाचे नेतृत्व (Captain) जॉस बटलरकडे (Jos Buttler) सोपवण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सचा रन मशिन जॉस बटलर इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 संघाचे देखील नेतृत्व करणार आहे. संघात अष्टपैलू खेळाडू सॅम करनचा देखील समावेश करण्यात आला आहे. तो दुखापतीनंतर संघात पुनरागमन करेल.

हेही वाचा: ENG vs IND Live : अँडरसन - पॉट्सचा भेदक मारा; भारताचा निम्मा संघ माघारी

इंग्लंडचा वनडे संघ :

जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हरटन, एम. पार्किंसन, जो रूट, जेसन रॉय, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेविड विली.

इंग्लंडचा टी 20 संघ :

जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रुक, सॅम करन, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, एम. पार्किसन, जेसन रॉय, फिल साल्ट, डेविड विली, रीस टॉपली.

हेही वाचा: ENG vs IND : विराटला तेंडुलकर - गावसकरांच्या पंक्तीत बसण्याची संधी

दरम्यान, बीसीसीआयने भारतीय संघाचे घोषणा गुरूवारीच केली होती. एजबेस्टन कसोटीत कोरोना झाल्यामुळे संघाबाहेर असलेला रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळणार आहे. तो वनडे आणि टी 20 मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. पहिल्या टी 20 सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर खेळणार नाहीत कारण ते एजबेस्टन कसोटीत खेळत आहेत.

Web Title: India Vs England Odi T20i Series Jos Buttler Will Lead Both England Teams

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..