Team India : पंतमुळे 'या' खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त! कधी मिळणार टीम इंडियात संधी!

टीम इंडियाचा एक खेळाडू त्याच्या पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहत आहे ऋषभ पंतमुळे हा खेळाडू संघात स्थान मिळवू शकलेला नाही.
rishabh pant Team India
rishabh pant Team Indiasakal

Team India : सध्या टीम इंडियात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतला पहिली पसंती आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये ऋषभ पंत टीम इंडियाची पहिली पसंती आहे. टीम इंडियात ऋषभ पंतच्या सततच्या समावेशामुळे युवा खेळाडू अजूनही पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु तो संघाच्या 11व्या खेळाडूत स्थान मिळवू शकत नाही.

rishabh pant Team India
PAK vs SL Asia Cup Final: लंकेला सहाव्यांदा तर पाकला तिसऱ्यांदा 'चॅम्पियन' बनायचे संधी

ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. पंतमुळे युवा यष्टिरक्षक केएस भरतला अद्याप टीम इंडियासाठी पदार्पण करता आलेले नाही. केएस भरतला कसोटी संघात बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात ठेवण्यात येते आहे फक्त. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केएस भरतने सध्या शानदार फलंदाजी केली.

rishabh pant Team India
T20 World Cup : टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, बुमराह अन् पटेल फिट

श्रीकर भरतने 107 चेंडूत 74 धावांची खेळी करत निवड समितीचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. केएस भरतने याआधी अनेक वेळा फलंदाज म्हणून अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत, मात्र त्याला अद्याप संघात प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेले नाही. केएस भरतने टीम इंडियासाठी एका सामन्यात विकेटकीपिंगही केले आहे. केएस भरतने कसोटी सामन्यात जखमी रिद्धिमान साहाच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी घेतले होती. केएस भरत विकेटकीपिंग कौशल्यात ऋषभ पंतपेक्षा सरस आहे.

rishabh pant Team India
India Legends ची विजयी सुरुवात; स्टुअर्ट बिन्नीने ठोकले अर्धशतक

केएस भरत हे आंध्र प्रदेश संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतात. केएस भरतने 2013 मध्ये डेब्यू सामना खेळला होता. त्याने 80 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4312 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली. तर लिस्ट ए च्या 56 सामन्यात 1721 धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 5 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com