Rishabh Pant बोलत होता...! धोनीने फेकून दिला फोन; काय आहे प्रकरण...

धोनीसह टीम इंडियाचे स्टार खेळाडू होते इंस्टाग्रामवर LIVE, पाहा VIDEO
rishabh pant enjoy intagram live with ms dhoni
rishabh pant enjoy intagram live with ms dhonisakal

Rishabh Pant Enjoy Intagram Live With MS Dhoni : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचे खेळाडू त्रिनिदाद, वेस्ट इंडिज येथे पोहोचले आहेत. ऋषभ पंतने मंगळवारी इंस्टाग्रामवर धमाल केली. ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर रोहित शर्मा आणि सूर्यकुमारसह अनेक स्टार्स लाईव्ह आले. महेंद्रसिंग धोनी लाईव्हमध्ये दिसला. धोनीने काही सेकंदांसाठी आपली उपस्थिती दर्शवली, परंतु नंतर जे घडले ते पाहून कोणीही हसेल.

rishabh pant enjoy intagram live with ms dhoni
Mumbai Cricket Association गावसकर, तेंडुलकर यांचा मतदानाचा हक्क हिसकावून घेणार?

टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलेल्या ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट सुरू करून भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. पंतने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यासोबत खूप मजा केली. दरम्यान, पंतने लाइव्हमध्ये साक्षी धोनीलाही जोडले, ज्याने हाय हॅलो म्हटले आणि नंतर धोनीची बाजूला फोन केला. धोनीनेही हाय हॅलो म्हटले, पण पंतने माही भाई, कसे आहात असे म्हणताच. धोनीने साक्षीचा फोन हिसकावून लाईव्ह बंद केल. काही सेकंदांसाठी इंस्टाग्रामवर लाईव्ह दिसलेला धोनी ट्विटरवर ट्रेंड करू लागला.

rishabh pant enjoy intagram live with ms dhoni
Women's World Cup : BCCI 2025 चा वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी लावणार जोर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव हे देखील 26 जुलै रोजी वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत. ही मालिका 29 जुलैपासून सुरू होणार आहे. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. या मालिकेतील संघाची धुरा शिखर धवनच्या हाती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com