Mumbai Cricket Association गावसकर, तेंडुलकर यांचा मतदानाचा हक्क हिसकावून घेणार?

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रस्ताव
Sachin Tendulkar Sunil Gavaskar
Sachin Tendulkar Sunil Gavaskar sakal

Mumbai Cricket Association : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) घटनादुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. एमसीएच्या आगामी बैठकीत दोन तृतीयांश संलग्न सदस्यांनी या प्रस्तावास पाठिंबा दाखवल्यास एमसीएकडून घटनेमधील नव्या बदलासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील. सर्वोच्च न्यायालयाकडून या बदलाला मान्यता देण्यात आल्यास एमसीएच्या आगामी निवडणुकांमध्ये सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना मतदान करता येणार नाही.

Sachin Tendulkar Sunil Gavaskar
Women's World Cup : BCCI 2025 चा वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी लावणार जोर

एमसीएशी संलग्न असलेले बहुतांशी सदस्य हे राजेंद्र लोढा समितीकडून तयार करण्यात आलेल्या शिफारशींविरोधात आहेत, अशी माहिती एमसीएच्या कार्यकारिणीतील सदस्यांकडून या वेळी देण्यात आली. येत्या २९ जुलै रोजी एमसीएची विशेष बैठक होणार आहे. त्यामध्ये प्रस्तावांसाठी मतदान केले जाईल. दरम्यान. आंतरराष्ट्रीय खेळाडू हे सहयोगी सदस्य असतील. त्यांचे सहाय्य व सल्ला घेतला जाईल, असे या प्रस्तावात म्हटले गेले आहे.

Sachin Tendulkar Sunil Gavaskar
Chess Olympiad 2022: विक्रमी 187 देशांचा सहभाग; भारताचे सर्वाधिक सहा

७० वर्षांवरील व्यक्ती पदावर कायम

संलग्न सदस्यांकडून आलेल्या प्रस्तावामध्ये ७० वर्षांवरील व्यक्तींनाही एमसीएच्या कार्यकारिणीतील पदावर कायम राहण्याचा अधिकार असावा, हा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com