Rishabh Pant Health Update : वाईट बातमी! ऋषभ पंतच्या कमबॅकवर मोठं प्रश्नचिन्ह, 6 आठवड्यात दुसरी शस्त्रक्रिया

Rishabh Pant Health Update
Rishabh Pant Health Updateesakal

Rishabh Pant Health Update : भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत अपघातातील दुखापतींमधून अजून सावरलेला नसताना अजून एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. ऋषभ पंतला उपचारासाठी मुंबईला हालवल्यानंतर त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर पंत सहा ते आठ महिन्यात मैदानावर परतेल अशी अशा व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे पंतच्या 2023 चा वर्ल्डकप खेळण्याच्या आशा वाढल्या होत्या.

Rishabh Pant Health Update
Sharad Pawar : पुणेकर शिवराज राक्षेच्या विजयानंतर शरद पवारांचं ट्विट चर्चेत

मात्र मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंतची दुखापतीवर आता कुठे अर्धे काम झाले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगतल्या प्रमाणे ऋषभ पंतवर येत्या सहा आठवड्यात पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे तो वनडे वर्ल्डकपपर्यंत फिट होणे अवघड आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, 'ऋषभ पंत कधी मैदानावर परतेल हे आताच सांगणे कठिण आहे. मात्र त्याच्या शेवटच्या वैद्यकीय रिपोर्टनुसार त्याची स्थिती फार चांगली नाहीये. तो जवळपास 8 ते 9 महिने मैदानावर उतरू शकणार नाही. तो वर्ल्डकपला देखील मुकण्याची शक्यता आहे. हे सर्व त्याची पुढची शस्त्रक्रिया कशी होते याच्यावर अवलंबून आहे.'

Rishabh Pant Health Update
Maharshtra Kesari : एकाच गुरूचे दोन शिष्य भिडले; शिवराजनं दोस्तालाच केलं चितपट!

ऋषभ पंतच्या गुडघ्यामधील सर्व तीन लिगामेंटला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्याच्या दोन लिगामेंटवर शस्त्रक्रिया केली आहे. आता त्याच्यावर तिसऱ्या लिगामेंटवर सहा आठवड्यात दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ऋषभ पंतचे मैदानावर परतणे हे तो दुखापतीतून कसा सावरतो याच्यावर अवलंबून आहे.

ऋषभ पंत रूग्णालयातून घरी आला की तो आपल्या रिहॅबिलिटेशन आणि ट्रेनिंगला सुरूवात करेल. ऋषभ पंत अजून एक आठवडा तरी रूग्णालयातच राहण्याची शक्यता आहे. या दिवसात तो वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करेल.

(Sports Latest News)

हेही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com