INDvsWI : कोहली म्हणतोय, या पंतला वगळायचे का राव?

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

महेंद्रसिंहसाठी पर्याय म्हणून वारंवार संधी देण्यात येत असलेला यष्टीरक्षक फलंदज रिषभ पंतने पहिल्या दोन सामन्यात फारच निराशा केली आहे. चार आणि शुन्य अशी कामगिरी त्याने केली आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यात यष्टीरक्षण करणारा फलंदाज के. एल. राहुलला संधी देण्याबाबतही संघ व्यवस्थापन गंभीर असेल. 

फ्लोरिडा : महेंद्रसिंहसाठी पर्याय म्हणून वारंवार संधी देण्यात येत असलेला यष्टीरक्षक फलंदज रिषभ पंतने पहिल्या दोन सामन्यात फारच निराशा केली आहे. चार आणि शुन्य अशी कामगिरी त्याने केली आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यात यष्टीरक्षण करणारा फलंदाज के. एल. राहुलला संधी देण्याबाबतही संघ व्यवस्थापन गंभीर असेल. 

दुसऱ्या सामन्यातील विजयाबाबत बोलताना कोहली म्हणाला, खेळपट्टी सुरवातीला फलंदाजीस चांगली होती. नवा चेंडू बॅटवर व्यवस्थितपणे येत होता. आम्ही भक्कम पायाभरणी केली त्यानंतर रवींद्र जडेजा आणि क्रुणाल पंड्या यांनी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली आम्ही 180 धावांपर्यंतही जाऊ शकतो असतो. मात्र काही काळानंतर खेळपट्टी संथ होत गेली. 

भारतीय कर्णधाराने ऑफस्पिनिर वॉशिंग्टन सुंदरचे कौतुक केले. दोन्ही सामन्यात आम्ही त्याच्याद्वारे आक्रमण सुरु केले ते आव्हान त्याने स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या आक्रमक सलामीवीरांसमोरची त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. तो चांगली फलंदाजीही करू शकतो त्यामुळे भविष्यात संघासाठी तो उपयुक्त खेळाडू असेल, असे विराट म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishabh Pant might be rested for the 3rd T20 against WI