Rishabh Pant: ऋषभ पंतचा नर्व्हस नाईंटीचा षटकार; वर्षभरात तिसऱ्यांदा हुकले शतक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

Rishabh Pant: ऋषभ पंतचा नर्व्हस नाईंटीचा षटकार; वर्षभरात तिसऱ्यांदा हुकले शतक

Rishabh Pant India vs Bangladesh 2nd Test : मिरपूर कसोटीदरम्यान डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पंतच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. पंतने 104 चेंडूत 93 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 5 षटकार ठोकले. वर्षात पंतचे तिसऱ्यांदा कसोटी शतक हुकले आहे. पंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत सहाव्यांदा नर्व्हस नाईन्टीजला बळी पडला.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय यष्टीरक्षकाने तुफानी फलंदाजी केली. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 100 मीटरच्या एका हाताने लांबलचक षटकार मारले, परंतु असे असतानाही तो त्याच्या कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावण्यापासून वंचित राहिला.

भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात बांगलादेशचा जोरदार धुव्वा उडवला. त्याने 49 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यानंतर तो अधिक आक्रमक झाला आणि झपाट्याने शतकाच्या जवळ पोहोचला. मात्र टी ब्रेकनंतर दुसऱ्या सत्राच्या तुलनेत त्याचा वेग थोडा कमी झाला. तिसऱ्या सत्रातही तो थोडा संघर्ष करताना दिसला.

91 धावांवरही तो धावबाद होण्यापासून वाचला होता. 66व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पंत एकेरी धावांवर बाद झाला असता, पण डायव्हिंग करून धावबाद होण्यापासून वाचवला, परंतु त्यानंतर त्याला त्याच्या डावात अधिक धावा करता आल्या नाहीत आणि तो 93 धावांवर पॅव्हेलियन परतला. पंत यंदा तिसऱ्यांदा शतकी खेळीपासून वंचित राहिला.