T20 World Cup : भारत-पाक सामन्यात पंत Playing-11 मधून बाहेर, या खेळाडूचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rishabh pant Team India

T20 World Cup : भारत-पाक सामन्यात पंत Playing-11 मधून बाहेर, या खेळाडूचा दावा

India vs Pakistan T20 World Cup Rishabh Pant Playing-11 : 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या 'हाय व्होल्टेज' सामन्यासाठी भारताचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठाणने आपला प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. त्याने स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे.

टी-20 विश्वचषकासाठी जवळपास सर्वच देशांनी संघ जाहीर केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 15 सदस्यीय संघाचीही निवड केली आहे. त्याचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संघात यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोघांपैकी एकालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण असल्याचे निश्चितच मानले जात आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. भारतीय संघात त्याने ऋषभ पंतपेक्षा अनुभवी दिनेश कार्तिकला प्राधान्य दिले आहे. इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, माझ्या मते पहिला सामन्यात स्पिनरसह अनुभवी गोलंदाजांची गरज आहे.

इरफानची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल/अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार