Rishabh Pant :'त्या क्षणाला काय वाटलं?', भीषण कार अपघाताबद्दल पहिल्यांदाच बोलला ऋषभ पंत

Rishabh Pant on Horrific Car Accident News : जवळपास वर्षांनंतर पंतने एका कार्यक्रमादरम्यान त्या क्षणी काय वाटलं ही सांगितले...
Rishabh Pant on Horrific Car Accident News
Rishabh Pant on Horrific Car Accident NewsSakal

Rishabh Pant on Horrific Car Accident : डिसेंबर 2022 मध्ये भारतीय क्रिकेट स्टार ऋषभ पंत आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रुरकीहून नवी दिल्लीला जात असताना वाटेत त्याचा भीषण अपघात झाला होता. जवळपास वर्षांनंतर पंतने एका कार्यक्रमादरम्यान त्या क्षणी काय वाटलं ही सांगितले आहे. अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता आणि कपाळावर जखमा झाल्या. हा 26 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज तेव्हापासून क्रिकेटपासून दूर आहे.

Rishabh Pant on Horrific Car Accident News
Sarfaraj Khan : पहाटे सुरू झाली नेटप्रॅक्टिस! टीम इंडियात जागा मिळल्यानंतर सरफराज खान पोहचला क्रॉस मैदानात

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पंत म्हणाला की, ''पहिल्यांदा मला वाटले की या जगात माझा वेळ संपला आहे. मी खूप नशीबवान होतो कारण ही घटना खूप वाईट असू शकते. डॉक्टरांनी सांगितले की तुला बरे होण्यासाठी 16 ते 18 महिने लागतील. मला दुसरे जीवन मिळाले हे मी भाग्यवान आहे. प्रत्येकाला दुसरे जीवन मिळत नाही."

या अपघाताच्या एका वर्षानंतर पंत आता बरा झाला आहे. आणि लवकरच तो मैदानात परतताना दिसणार आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात पंतला दिल्ली कॅपिटल्सच्या टेबलावर बसून बोली लावताना दिसला होता. पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सची गेल्या वर्षीची कामगिरी काही खास नव्हती. पण यावेळी पंत काही नवीन कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Rishabh Pant on Horrific Car Accident News
Ranji Trophy : महाराष्ट्र-हरियाना लढत अनिर्णित ; दहा फलंदाज बाद करणारा प्रदीप दाढे सामनावीर

ऋषभ पंतने आतापर्यंत 33 कसोटी सामन्यांमध्ये 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत ज्यात 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने 987 धावा केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय बद्दल बोलायचे तर, पंतने 30 सामन्यांमध्ये 34.60 च्या सरासरीने 865 धावा (1 शतक, 5 अर्धशतके) केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com