धोनीची जागा घेण्यासाठी रिषभ गाळतोय घाम!

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

एकदिवसीय मालिकेमध्ये न्यूझीलंडवर दमदार विजय मिळविल्यावर भारतीय संघ आता ट्वेंटी20 मालिकेतही धडाकेबाज कामगिरी करण्यास सज्ज आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे संघातील स्थान अढळ असले तरीही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतही संघात स्थान मिळविण्यासाठी कसून सराव करत आहे. 

वेलिंग्टन : एकदिवसीय मालिकेमध्ये न्यूझीलंडवर दमदार विजय मिळविल्यावर भारतीय संघ आता ट्वेंटी20 मालिकेतही धडाकेबाज कामगिरी करण्यास सज्ज आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे संघातील स्थान अढळ असले तरीही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतही संघात स्थान मिळविण्यासाठी कसून सराव करत आहे. 

 

मैदानावर चारही बाजूंना फटकेबाजी करण्यात पंत पटाईत आहे. त्यामुळे पहिल्या ट्वेंटी20 सामन्यापूर्वी सराव पंतने अनेक शॉट्सचा सराव केला. नेट्समध्ये स्विच फटका मारतानाचा त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विट केला आहे. 

ट्वेंटी20 मध्ये फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. धोनीला फॉर्म गवसला असला तरी तो फटकेबाजी करण्यासाठी वेळ घेतो. तसेच पंतला संधी देण्यासठी धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेसाठी संघातून वगळ्यात आले होते. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी20 मालिकेत पंतला संधी मिळण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishabh Pant practicing hard ahead of T20 series against New Zealand