Rishabh Pant: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंतची जागा घेणार 'हा' दिग्गज खेळाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

Rishabh Pant: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंतची जागा घेणार 'हा' दिग्गज खेळाडू

Rishabh Pant : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातानंतर रुग्णालयात आहे. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली नसून, त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. पंतच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन आणि तपासण्या केल्या जात आहेत. जेणेकरून त्याच्या दुखापतीचा अचूक अंदाज लावता येईल. त्याला मैदानात परतण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, पंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही.

हेही वाचा: IND vs SL: टीम इंडियामध्ये तीन सलामीवीर! कर्णधार हार्दिक कुणाला देणार संधी

भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकेसाठी ऋषभ पंतची भारतीय संघात निवड झालेली नाही. मात्र पंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळणार होता. भारताला 9 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी सामने खेळायचे आहेत. जर पंत या मालिकेत खेळला नाही तर त्याच्या जागी केएस भरत किंवा इशान किशनला भारतीय संघात समाविष्ट केले जाऊ शकते.

हेही वाचा: Maharashtra Kesari : विजेत्या पैलवानाला यंदा 'महिंद्रा थार' तर उपविजेता बुलेटचा मानकरी

ऋषभ पंत दुबईहून परतला आणि आईला भेटायला चालला होता. शुक्रवारी सकाळी त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतच्या मेंदूला किंवा पाठीच्या कण्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, पण गुडघाला झाली आहे. यामुळे पंत दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानाबाहेर असणार आहे. पंत दोन ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतात. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, "त्याच्या गुडघ्यात खूप सूज आहे, त्यामुळे त्याचा एमआरआय अजून व्हायचा आहे."

ऋषभ पंतच्या जागी नवीन निवड समितीकडे तीन पर्याय असतील. भारत अ संघाचे दोन यष्टिरक्षक भरत आणि उपेंद्र यांना थेट मुख्य संघात स्थान मिळू शकते किंवा इशान किशनसारख्या स्फोटक खेळाडूला संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर संजू सॅमसनही कसोटी संघाचा भाग असू शकतो.

भारत कसोटी संघाचा दुसरा यष्टिरक्षक असल्याने नागपुरात भारतासाठी पहिला सामना खेळू शकतो. तथापि उपेंद्र या क्षणी एक चांगला पर्याय दिसतो, त्याने सरासरी 45 पेक्षा जास्त धावा केल्या. तो चांगला यष्टिरक्षक असून मोठे फटके खेळण्यास सक्षम आहे. तथापि पंतकडे असलेला एक्स फॅक्टर या दोघांच्या बाबतीत नाही. इशान किंवा संजू सॅमसन यांनी आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दबाव सहन केला आहे, त्यामुळे हे दोघेही चांगले पर्याय असू शकतात.