Rishabh Pant Update : भीषण रस्ते अपघातानंतर ऋषभ पंतचं पहिलं ट्वीट; म्हणाला, मैदानातील...

30 डिसेंबर रोजी घरी परतत असताना ऋषभ पंतच्या कारला रुरकीजवळ दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला होता.
Rishabh Pant IPL 2023
Rishabh Pant IPL 2023sakal
Updated on

Rishabh Pant Tweet : काही दिवसांपूर्वी भीषण अपघाताला सामोरे जाणाऱ्या भारतीय संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंतने अपघातानंतर पहिले ट्विट केले आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Rishabh Pant IPL 2023
Nepal Plane Crash : संक्रांतीच्या शुभेच्छा ठरल्या अखेरच्या; लोककलावंताची पोस्ट व्हायरल

यामध्ये त्याने त्याच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, मैदानातील परतीचा प्रवास सुरू झाला असून, पुढील आव्हानांसाठी सज्ज असल्याचे पंतने ट्वीटमध्ये म्हटले आहे. अपघातानंतर मदत केल्याबद्दल पंतने बीसीसीआय आणि जय शहा यांना टॅग करत त्यांचे आभार मानले आहेत.

30 डिसेंबर रोजी घरी परतत असताना ऋषभ पंतच्या कारला रुरकीजवळ दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला होता. या धडकेनंतर पंतच्या कारने पेट घेतला होता. वेळीच सावध होत पंत गाडीतून बाहेर पडला. त्यामुळे पुढील मोठा धोका टळला.

तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक

बीसीसीआय आणि जय शाहांसोबतच पंतने सर्व चाहते, डॉक्टर आणि फिजिओ यांचेदेखील मनापासून आभार मानले आहेत. तसेच तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com