
भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथी कसोटी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अशी कामगिरी केलीय जी १४८ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणताही यष्टीरक्षक करू शकला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ४ बाद २६४ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके झळकावली. तर ऋषभ पंत पायाला चेंडू लागल्यानं रिटायर्ड हर्ट होऊन परतला.