Roger Federer Retirement : 'प्रिय रॉजर, हा दिवस कधीच येऊ नये ...' राफाने लिहिली भावनिक पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Roger Federer Retirement Rival Rafael Nadal Reaction

Roger Federer Retirement : 'प्रिय रॉजर, हा दिवस कधीच येऊ नये ...' राफाने लिहिली भावनिक पोस्ट

Roger Federer Retirement Rival Rafael Nadal Reaction : रॉजर फेडररने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. 41 वर्षाचा फेडरर या महिन्यात लंडन येथे होणाऱ्या लेव्हर कपनंतर निवृत्त होत आहे. दरम्यान, टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या फेडररने आपला निर्णय जाहीर केल्या केल्या क्रीडा विश्वातील दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली. मात्र यामध्ये फेडररचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि तितकाच चांगला मित्र राफेल नदालने त्याच्यासाठी लिहिलेल्या भावनिक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा: Roger Federer : टेनिस कोर्टवरील 5 ऐतिहासिक 'Roger Things'

राफेल नदाल आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'प्रिय रॉजर माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी, हा दिवस कधीच येऊ नये अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आणि क्रीडा जगतासाठी हा दिवस माझ्यासाठी दुःखाचा दिवस आहे. तुझ्यासोबत इतकी वर्षे शेअर केली, कोर्टवरील अनेक अद्भुत क्षण जगलो हा मी माझा सन्मान समजतो.'

राफा पुढे म्हणतो की, 'आपण असे अनेक क्षण भविष्यात देखील एकमेकांशी शेअर करणार आहोत. दोघांनी एकत्र अनेक गोष्टी करायच्या बाकी आहेत. हे आपल्याला माहिती आहे. सध्याच्या घडीला मी तू आयुष्यात आनंदी रहावास अशा शुभेच्छा देतो. तुझी पत्नी मिरका, तुझी मुंल आणि कुटुंबासोबत भविष्यात आनंदी रहा. आता आपण लंडनमध्ये भेटू'

हेही वाचा: James Neesham : केंद्रीय करार नाकारला; पैशासाठी देशाचा संघ सोडला?

रॉजर फेडररने गुडघ्याच्या दुखापतीमुळे 2021 च्या विम्बल्डन स्पर्धेनंतर कोणताही स्पर्धा खेळलेली नाही. आता तो शेवटची स्पर्धा लंडनमध्ये खेळणार आहे. लेव्हर कप स्पर्धा ही 23 किंवा 25 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या स्पर्धेत युरोपातील स्टार टेनिसपटू हे इतर जगभरातील टेनिसपटूंविरूद्ध खेळत असतात. या स्पर्धेत टीम युरोपमध्ये राफेल नदाल आणि फेडरर एकाच संघाकडून खेळणार आहे.

Web Title: Roger Federer Retirement Rival Rafael Nadal Reaction Wrote Emotional Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..