James Neesham : केंद्रीय करार नाकारला; पैशासाठी देशाचा संघ सोडला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

All Rounder James Neesham Refuse Central Contract Of New Zealand Cricket Board

James Neesham : केंद्रीय करार नाकारला; पैशासाठी देशाचा संघ सोडला?

James Neesham New Zealand Cricket Board : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने यापूर्वी केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. आता अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशमने देखील केंद्रीय करारापासून स्वतःला वेगळे केले. यामुळे पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी किवींना मोठा धक्का बसला आहे. नीशमने केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. मात्र यावर नीशमने स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा: VIDEO : 'पोल खोल' जखमी खेळाडूच्या उपचारासाठी PCB कडं पैसाच नाही : Shahid Afridi

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात 2022 - 23 या हंगामासाठी केंद्रीय करार लागू केला होता. या करारात एकूण 20 खेळाडूंचा समावेश होता. मात्र जेम्स नीशम या कराराचा भाग नव्हता. दरम्यान, नीशमने जगभरातील टी 20 लीग्जमध्ये खेळण्यासाठी करार केले आहेत. दरम्यान, त्याला बोर्डाने केंद्रीय कराराची ऑफर दिली त्यावेळी त्याने नकार दिला. तो म्हणाला की मी इतर फ्रेंचायजींशी अन्याय करू शकत नाही. त्यांनी मला आपल्या संघात सामावून घेतले आहे.

नीशमला नेटकरी ट्रोल करत असताना त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकर दिले. 'मी केंद्रीय करार सोडण्याचा निर्णय घेऊन देशापेक्षा पैशाला जास्त महत्व दिले असे तुम्हाला वाटते हे मला माहिती आहे. मी विचार केला होता की मी जुलै महिन्यात करारावर स्वाक्षरी करेन. मात्र मला या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे मी बाकीच्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. हा माझ्यासाठी अवघड निर्णय होता. न्यूझीलंडकडून खेळणे ही माझी सर्वात मोठा अचिव्हमेंट आहे. मी माझ्या संघ सहकाऱ्यांसोबत मैदानावर उतरून मोठ्या स्पर्धेत देशाला विजय मिळवून देऊ इच्छितो. यासाठी मला रोज मिचेल सँटनरचा स्टुपिड चेहरा पाहावा लागला तरी चालेल.'

हेही वाचा: IND W vs ENG W: शेवटच्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव; यजमानांनी मालिका 2-1 ने जिंकली

नीशमपूर्वी ट्रेंट बोल्टने देखील केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. सुरूवातीला तो निवृत्ती जाहीर करतो की काय अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याने त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे असे सांगितले. बोल्ट म्हणाला की, 'हा निर्णय मी माझी पत्नी गर्ट आणि तीन मुलांसाठी घेतला आहे. कुटुंब हे माझे कायम प्रेरणास्थान राहिले आहे. त्यामुळे मी त्याला सर्वाधिक प्राथमिकता देतोय.'

Web Title: All Rounder James Neesham Refuse Central Contract Of New Zealand Cricket Board

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..