Rohan Bopanna Australian Open : रोहन बोपन्नाने इतिहास रचला; 43 व्या वर्षी जिंकलं पहिलं वहिलं ग्रँड स्लॅम

Australian Open 2024 Rohan Bopanna : रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. आता ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तो पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
Rohan Bopanna Australian Open
Rohan Bopanna Australian Open esakal

Australian Open 2024 Rohan Bopanna :

रोहन बोपन्ना आणि त्याचा पार्टनर मॅथ्यूज एब्डनने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावलं. त्यांनी इटालियन जोडी सिमोने आणि अँड्रियाचा 7-6 (7-0), 7-5 असा पराभव केला. बोपन्नाने वयाच्या 43 व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. यापूर्वी बोपन्ना हा युएस ओपनमध्ये दोनवेळा फायनलमध्ये पोहचला होता.

त्याने 2010 आणि 2023 मध्ये फायनल गाठली होती. मात्र त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. अखेर ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद मिळवत रोहन बोपन्ना ओपन एरामध्ये पुरूष दुहेरीत रँकिंगमध्ये अव्वल असणारा अन् ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला.

Rohan Bopanna Australian Open
Australian Open 2024 : सबलंकाने सलग दुसऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलिया ओपन

ऑस्ट्रेलिय ओपन 2024 पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यूज एब्डन यांचा मुकाबला सिमोने आणि अँड्रिया या इटालियन जोडीशी होता. पहिल्या सेटमध्ये रोहन बोपन्ना आणि एब्डन यांनी चांगली सुरूवात केली. मात्र इटालियन जोडीने त्यांना कडवी टक्कर देत सेट टाय ब्रेकरवर नेला. अखेर टाय ब्रेकरवर गेलेला सेट बोपन्ना आणि एब्डन यांनी 7-6 (7-0) असा जिंकला.

त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये देखील इटालियन जोडीने दमदार खेळ करत पहिले दोन गेम जिंकले होते. त्यांनी 2 - 0 अशी आघाडी घेतली मात्र अनुभवी बोपन्ना आणि एब्डनने 3-3 अशी बरोबरी करत दुसरा सेट देखील चुरशीचा केला. मात्र चौथा गेम सिमोने आणि अँड्रिया यांनी जिंकत पुन्हा आघाडी घेतली.

Rohan Bopanna Australian Open
IND vs ENG : अक्षरची चूक भारताला महागात पडणार? पोपचा शतकी धमाका अन् सामना गेला चौथ्या दिवसावर

मात्र पिछाडी भरून काढत बोपन्ना आणि एब्डनने दुसऱ्या सेटमध्ये 5 - 5 अशी बरोबरी केली. त्यानंतर दुसरा सेट बोपन्ना आणि एब्डन यांनी 7-5 असा जिंकत इतिहास रचला. बोपन्नाने वयाच्या 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅमचे विजेतेपद पटकावलं.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीची फायनल देखील झाली. या सामन्यात बेलारूसच्या अरिना सबलंकाने चीनच्या झेहेंगचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनवर आपली मोहर उमटवली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com