Rohit Sharma Advice to Ranji Trophy performer Yash Dhull  Sarfaraz Khan
Rohit Sharma Advice to Ranji Trophy performer Yash Dhull Sarfaraz Khanesakal

'रूको जरा सबर करो' रोहितचा वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनला सल्ला

भारताचा तीन फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) श्रीलंका दौऱ्याआधी आज पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) काही दर्जेदार खेळी करणाऱ्या खेळाडूंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार यश धूलने (Yash Dhull) पदार्पणातच दोन्ही डावात दोन शतके ठोकली आहेत. तर मुंबईकडून खेळणाऱ्या सर्फराज खानने (Sarfaraz Khan) द्विशतक झळकावत रणजी हंगामाची धडाक्यात सुरूवात केली आहे. या दोघांबद्दल रोहितला विचारल्यानंतर त्याने यांना अशाच धावा करत रहा आणि संधी येण्याची वाट पाहा असा सल्ला दिला. (Rohit Sharma Advice to Ranji Trophy performer Yash Dhull Sarfaraz Khan)

Rohit Sharma Advice to Ranji Trophy performer Yash Dhull  Sarfaraz Khan
रोहित 'राज'मध्ये संजू सॅमसनचे उखळ होणार पांढरे?

रोहित म्हणाला की, 'मा या सर्वांना सांगू इच्छितो की अशाच धावा करत रहा. तुम्हाला जशी हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, शुभमन गिलला संधी मिळाली तशी नक्की संधी मिळेल. आता हे सर्व खेळाडू संघाचे भाग आहेत. तुम्ही खाली मान घालून फक्त तुमचे काम करत रहा. मी आता इतकेच सांगू शकतो. आम्ही सर्व तुमच्याकडून याचीच अपेक्षा करत आहोत.'

Rohit Sharma Advice to Ranji Trophy performer Yash Dhull  Sarfaraz Khan
हिटमॅन म्हणतो, 'विराट' वर्कलोडचं नो टेन्शन!

या गुणी खेळाडूंना संधी मिळण्याबाबत रोहित शर्मा म्हणाला, 'जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी तुम्हाला संधी मिळेल. मला विश्वास आहे की ते देखील सध्या आपल्या खेळावरच लक्ष केंद्रीत करत असतील. संघात निवड होते की नाही याची काळजी करत बसण्यापेक्षा तुम्ही जास्तीजास्त धावा करण्यावर भर द्या.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com