Team India : वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलणार? संघ व्यवस्थापनने दिले संकेत

सोशल मीडियावर रंगली चर्चा वर्ल्ड कप मध्ये पण ऋषभ पंत करणार ओपनिंग
 rohit sharma and rishabh pant
rohit sharma and rishabh pantsakal

T20 World Cup 2022 Team India : टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर ICC टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी पर्थमध्ये सराव करत आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीची सवय करून घेण्यासाठी भारतीय खेळाडू कोणतीही कसर सोडत नाहीत. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. भारतीय संघात असे अनेक युवा खेळाडू आहेत जे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळले नाहीत. अशा परिस्थितीत आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडिया नियोजित वेळेपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.

 rohit sharma and rishabh pant
प्रेम असावं तर असं! तिच्या मृत्यूनंतर मिलरनं भारताविरुद्धच्या सामन्यात 'अशी' वाहिली श्रद्धांजली

टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या तयारीत असलेला भारतीय संघ आपला पहिला सराव सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना विराट आणि राहुल खेळत नसल्यामुळे या सामन्यात संघाच्या फलंदाजीच्या क्रमात बदल झाला. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली. त्यामुळे सोशल मीडियावर एक चर्चा रंगली वर्ल्ड कप मध्ये पण ऋषभ पंत ओपनिंग करणार आहे.

T20 विश्वचषकातील भारताचे पूर्ण वेळापत्रक-

  • 17 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सराव सामना) सकाळी 9.30 वा

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना) दुपारी 1.30 वाजता

  • 23 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1.30 वाजता

  • 27 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ, दुपारी 12:30

  • 30 ऑक्टोबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुपारी 4.30 वाजता

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध बांगलादेश, दुपारी 1.30 वाजता

  • 6 नोव्हेंबर - भारत विरुद्ध ब गटातील अव्वल स्थानावर असलेला संघ, दुपारी 1.30 वाजता

ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू : मोहम्मद.शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com