
Team India: भारताला Asia Cup जिंकून देणारे 'हे' 3 खेळाडू ह्या वेळेस नाही खेळणार
Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतीय संघाने आत्तापर्यंत सर्वाधिक 7 वेळा आशिया कपवर कब्जा केला आहे. भारताने शेवटचे आशियाचे विजेतेपद 2018 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. भारतासाठी 2018 मध्ये अनेक स्टार खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवला होता, मात्र आता हे खेळाडू टीम इंडियामध्ये पुन्हा दिसणार आहेत. त्याचबरोबर या 3 खेळाडूंपैकी एक खेळाडू निवृत्त झाला आहे.

kedar jadhav
आशिया चषक 2018 मध्ये मधल्या फळीत केदार जाधव भारतीय संघाचा एक महत्त्वाचा कणा होता. जेव्हा जेव्हा कर्णधार रोहित शर्माला मधल्या षटकांमध्ये विकेटची गरज भासली तेव्हा त्याने केधर जाधवने आपल्या कर्णधाराला निराश केले नाही. केदार जाधवने 2017 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता, त्यामुळे यावेळी त्याची आशिया कपमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.

ms dhoni
महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानला जातो. माहीने 2020 मध्ये निवृत्त घेतली आहे. भारताला शेवटचा आशिया चषक मिळवून देण्यात धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण यावेळी चाहत्यांना आशिया कपमध्ये धोनीची कामगिरी पाहता येणार नाही. 2018 च्या आशिया कपच्या फायनलमध्ये धोनीने बांगलादेशविरुद्ध 36 धावांची इनिंग खेळली होती.

ambati rayudu
आशिया कप 2018 मध्ये मधल्या फळीत खेळताना अंबाती रायडूने अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. त्यावेळी त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. 2015 पासून तो भारताकडून टी-20 सामने खेळलेला नाही. अशा परिस्थितीत भारताच्या टी-20 संघाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत.