esakal | IND vs ENG: आदमी एक और पराक्रम ५.. शतकवीर 'हिटमॅन'चा नादच खुळा
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma

INDvsENG: आदमी एक और पराक्रम ५.. शतकवीर 'हिटमॅन'चा नादच खुळा

sakal_logo
By
विराज भागवत

रोहितने एक शतक ठोकत केले पाच वेगवेगळे पराक्रम

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाचा हिटमॅन (Hitman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. दोन वेळा अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात अपयशी ठरल्यानंतर अखेर शनिवारी रोहितने दमदार शतक (Classic Century) झळकावले. इंग्लंडमधले हे रोहितने नववे आंतरराष्ट्रीय तर भारताबाहेरील पहिले कसोटी शतक ठरले. रोहितने आपल्या फलंदाजीचा दणका देत १२७ धावा कुटल्या. त्यात १४ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. महत्त्वाची बाब म्हणजे, या शतकी खेळीसह रोहितने तब्बल पाच वेगवेगळे पराक्रम (5 Different Milestones in Record Books) केले.

हेही वाचा: रोहितने मोडला द्रविडचा विक्रम; ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान

रोहितने षटकार लगावत आपले शतक साजरे केले. त्याने १२७ धावांची खेळी केली. पण एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. त्याच्या या शतकी खेळीमुळे त्याने एकाच खेळीत तब्बल पाच वेगवेगळे मैलाचे दगड गाठले.

पाच वेगवेगळे पराक्रम-

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ धावांचा टप्पा पार

  • कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार

  • इंग्लंडच्या भूमीवर २ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार

  • २०२१ या वर्षात १ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार

हेही वाचा: VIDEO : हिटमॅननं तोऱ्यात साजरी केली परदेशातील पहिली सेंच्युरी!

रोहितने मिळवलं डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान

रोहितने दमदार खेळी करत आपलं विदेशी भूमीवरील पहिलं कसोटी शतक झळकावलं. रोहितने इंग्लंडमध्ये एकूण नववे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. (Indian Batsman with Most Tons in England) त्यासोबतच त्याने महान फलंदाज राहुल द्रविड याच्या इंग्लंडमधील ८ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले. विशेष बाब म्हणजे, रोहितने एकूण ९ शतकांपैकी ८ शतके ही २०१८ ते २०२१ या कालावधीत ठोकली आहेत. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. त्यांच्या यादीत रोहितने स्थान मिळवले.

loading image
go to top