T20 WC 2022: टीम इंडीयाचा वाघ आला रे! विरोधकांना सुटला घाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup 2022

T20 WC 2022: टीम इंडीयाचा वाघ आला रे! विरोधकांना सुटला घाम

T20 World Cup 2022 : भारतीय संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे पाकिस्तान विरुद्ध हाय व्होल्टेज सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या या सामन्यापूर्वी एका वक्तव्याने विरोधी संघांची चिंता वाढली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भारतासाठी चिंतेची बाब होती. पण बुमराहला संघात कमी पडू देणार नाही हे मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले आहे.

हेही वाचा: Asaduddin Owaisi : हे कोणतं प्रेम… म्हणत ओवैसींची पाकिस्तानात न खेळणाऱ्या BCCI वर टीका

मोहम्मद शमीला विश्वचषक संघात स्थान मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वर्ल्ड कपच्या काही दिवस आधी तो कोरोनाच्या विळख्यात आला होता. पण स्पर्धेच्या एक दिवस आधी शमीचा अहवाल निगेटिव्ह आला. तो बुमराहच्या जागी संघात सामील झाला आहे. यानंतर शमीने एकाच षटकात तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला तारे दाखवले. कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या सहा दिवस आधी आपल्या 11 खेळाडूंची निवड केली आहे. मात्र तोपर्यंत कर्णधाराने शमीला गोलंदाजी करताना पाहिले नव्हते. त्याच वेळी आता हिटमॅनने वेगवान गोलंदाजाबद्दल एक मोठे अपडेट दिले आहे.

हेही वाचा: भेट राज ठाकरे शिंदे फडणविसांची पण चर्चा स्वेटरची, कोणाची आहे ही जर्सी ?

भारतीय कर्णधार म्हणाला की, मोहम्मद शमी विश्वचषकात गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कोरोनानंतर त्याने पुनरागमन केले असून आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आपल्या सर्वांना ऑस्ट्रेलियाच्या टाइम झोन आणि हवामानात मिसळण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. आता आमचा संघ विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सकाळी आणि संध्याकाळी पावसाची शक्यता आहे.