Rohit Sharma : वर्ल्डकपला सामोरे जाताना... रोहितचं ते एक वक्य अन् हार्दिक पांड्याचा जीव झाला वरखाली

Rohit Sharma T20 World Cup 2024 : रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप खेळणारच?
Rohit Sharma
Rohit Sharmaesakal

Rohit Sharma T20 World Cup 2024 : भारताने पहिल्या टी 20 सामन्यात अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानला धूळ चारली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा जवळपास 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात खेळला. निवडसमितीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अफगाणिस्तान मालिकेसाठी टी 20 संघात निवड केली. यानंतर रोहित आणि विराट हे जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील खेळण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती.

Rohit Sharma
Ishan Kishan : संपर्कच केला नाही... इशान किशनबाबत झारखंड क्रिकेट असोसिएशनने केला मोठा दावा

दरम्यान, अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यानंतर रोहित शर्माने एक वक्तव्य केलं. यामुळे तो टी 20 वर्ल्डकप खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे हार्दिक पांड्याचे टी 20 संघाचे वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करण्याचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. हार्दिक पांड्या सध्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

रोहित शर्मा पहिला टी 20 सामना झाल्यानंतर म्हणाला की, 'या तीन सामन्यांच्या मालिकेतून बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. टी 20 वर्ल्डकपपूर्वी आमच्याकडे फार टी 20 सामने खेळण्याची संधी नाही. आयपीएल आहे मात्र आंतरराष्ट्रीय सामना हा आंतरराष्ट्रीय सामना असतो.'

'या मालिकेत आम्ही काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी गेल्या वर्षभर संघासोबत नव्हतो. मात्र मी राहुल भाईशी टी 20 संघाबाबत काय करता येईल हे बोलत होतो. संघ म्हणून आपल्याला काय काय करता येईल याची चर्चा देखील करत होतो.'

Rohit Sharma
Babar Azam : मी तर सहन केलं नसतं आफ्रिदी भाई... बाबरचा 'तो' Video ठरतोय चर्चेचा विषय

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रोहित शर्मा क्रीजवर अवघे दोन चेंडूच टिकला. तो डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर धावबाद झाला. शुभमन गिल आणि त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला अन् रोहितला आपली विकेट गमावाली लागली. यानंतर रोहित शुभमन गिलवर चिडलेला देखील दिसला.

रोहित शर्मा 14 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला. त्याने शेवटचा टी 20 सामना हा 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्ध खेळला होता. त्यानंतर रोहित आता पुन्हा टी 20 क्रिकेट खेळणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता रोहित शर्मा टी 20 संघात परतला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com