Rohit Sharma : सेमीफायनलपूर्वी रोहित जाम घाबरला होता, टॉसनंतर सगळं सांगितलं

Rohit Sharma
Rohit Sharma

Rohit Sharma : टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर रोहित म्हणातो की, आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. सामना शेवटपर्यंत नेणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत इंग्लंडसोबत भरपूर क्रिकेट खेळलो आणि आम्हाला त्यांची ताकद आणि कमकुवतपणा माहीत आहे.

Rohit Sharma
Dinesh Karthik : संघाची घोषणा झाली अन् डीके - पंतचा सामन्यापूर्वीचा तो व्हिडिओ आला चर्चेत

यादरम्यान रोहितला विचारले असता त्याने सांगितले की, सेमीफायनलपूर्वी तो खूप घाबरला होता. वास्तविक त्याला उपांत्य फेरीपूर्वी नेट सत्रादरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल विचारण्यात आले होते. भारतीय कर्णधार म्हणाला की ही दुखापत भीतीदायक होती, पण आता मी पूर्णपणे बरा आहे. प्लेइंग इलेव्हनबाबत रोहित म्हणाला की, आमच्याकडे ज्या प्रकारची प्रतिभा आहे, त्यामुळे आम्हाला प्लेइंग इलेव्हनची निवड करणे अवघड होते. संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रोहितने सांगितले.

Rohit Sharma
Sania Mirza : घटस्फोट होताचं ‘सानिया मिर्झा’च्या अफेअरच्या चर्चांना फुटले तोंड

दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात जो जिंकणारा तो 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध अंतिम फेरीत खेळणार आहे. आठ वर्षांपासून टीम इंडिया जेतेपदाच्या सामन्यापर्यंत पोहोचलेली नाही. 2014 मध्ये अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाले होते. त्याचबरोबर 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव झाला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com