Freedom To Player : हिटमॅन म्हणाला, खेळाडूंना मैदानात उतरताना स्वातंत्र्य मिळाला पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

हिटमॅन म्हणाला, खेळाडूंना मैदानात स्वातंत्र्य मिळाला पाहिजे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : कोणत्याही खेळाडूसाठी स्वातंत्र्य फार महत्त्वाचे असते. खेळताना संघ किंवा कर्णधाराकडून स्वातंत्र्य मिळाले नाही तर कामगिरीवर परिणाम होते. यामुळे खेळाडूंना मैदानावर उतरताना पूर्ण स्वातंत्र्य देणे गरजेचे असते. याबाबत आपले रोखठोक मत टी-२० चा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.

न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आलेला आहे. अद्याप खेळल्या गेलेल्या दोन टी-२० सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या रूपात भारताला नवीन कर्णधार मिळाला आहे. मालिकेत भारताने २-० अशी अभेद्य आघाडी घेतलेली आहे. विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आणि बेंच-स्ट्रेंथबद्दल मोकळेपणाने बोलला.

हेही वाचा: काँग्रेसकडून राजेंद्र मुळक मैदानात! नाव घोषित होण्याची प्रतीक्षा

कर्णधार म्हणून माझे काम हे असेल की नवीन खेळाडू जेव्हाही खेळायला येतो तेव्हा त्यांना आरामदायक वाटले पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टीची चिंता न करता तो खेळला पाहिजे. यासाठी खेळाडूंना स्वातंत्र्य द्यायला हवे. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी मैदानावर येताच फक्त खेळाचा विचार करा, असे रोहित शर्मा म्हणाला.

आमचा संघ खूप तरुण आहे. अनेक खेळाडूंनी खूप कमी सामने खेळले आहेत. अनेक खेळाडू संधीची वाट पाहत आहेत. परंतु, त्यांना नक्कीच भारतासाठी खेळता येईल. प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल. कठीण परिस्थितीत आम्ही चांगली कामगिरी केली, असेही रोहित शर्मा म्हणाला. अनेक मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिली असतानाही रोहित शर्माच्या नेतृत्वात नव्या खेळाडूंना संधी मिळत आहे, हे विशेष...

loading image
go to top