Rohit Rahul Record | IND vs NZ: रोहित-राहुल जोडीचा धमाका; केला धडाकेबाज विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-KL-Rahul

भारताने पहिल्या टी२० मध्ये न्यूझीलंडला दिली मात

IND vs NZ: रोहित-राहुल जोडीचा धमाका; केला धडाकेबाज विक्रम

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ 1st T20 : भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते न्यूझीलंडला पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. गप्टीलच्या ७० आणि चॅपमनच्या ६३ धावांच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. यास प्रत्युत्तर देताना सूर्यकुमार यादवच्या ६२ आणि रोहितच्या ४८ धावांच्या खेळीमुळे भारताना सामना जिंकला. या सामन्यात सलामीवीर रोहित-राहुल जोडीने एक धडाकेबाज विक्रम केला.

हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अवघ्या ५ षटकात या दोघांनी भारताला ५० धावा करून दिल्या. पण सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. सामन्यात या जोडीने एक दमदार विक्रम आपल्या नावे केला. रोहित-राहुल जोडीची ही टी२० सलामीवीर म्हणून सर्वाधिक १२ वी अर्धशतकी भागीदारी ठरली. याआधी हा विक्रम शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडीच्या नावावर होता. त्यांनी ११ वेळा अर्धशतकी भागीदारी केली होती.

हेही वाचा: IND vs NZ 1st T20I : गप्टिलसोबत चमकला नवा हिरो

दरम्यान, रोहित शर्माचा पूर्णवेळ टी२० कर्णधार म्हणून आणि राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच सामना होता. त्यामुळे अनेकांची या सामन्यावर नजर होती. या नव्या पर्वाची सुरूवात विजयाने झाली. रोहितचे अर्धशतक दोन धावांनी हुकले पण भारताच्या विजयाने ते दु:ख कमी झाले.

loading image
go to top